इतर
शिर्डी उपविभागीय कार्यालयात राष्ट्रध्वजास मानवंदना

शिर्डी,दि.२६-भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपविभागीय कार्यालयाच्या प्रांगणात उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्र ध्वजवंदन केले.

यावेळी श्री.अहिरे यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, महिला, नागरिक, अधिकारी -कर्मचारी, पोलीस कर्मचारी, विद्यार्थ्यांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी नायब तहसीलदार मनोज भोसेकर, सहाय्यक महसूल अधिकारी संतोष धोंगडे, शुक्लेश्वर ईजगे, ग्राम महसूल अधिकारी भाऊ पाटील जाधव, महसूल सहाय्यक सूर्यकांत खोजे, यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.