अहमदनगरक्राईम

श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशन चे पोलीस हवालदार लाचलुचपत च्या जाळ्यात!

यशस्वी सापळा अहवाल

▶️ युनिट – अहमदनगर
▶️ तक्रारदार- पुरुष वय- 60 जि.अहमदनगर
▶️ आलोसे – ज्ञानेश्वर रावसाहेब पठारे पोलिस हवालदार ब. न.20 नेमणूक बेलवंडी पोलीस स्टेशन जिल्हा अहमदनगर

▶️ लाचेची मागणी- १००००/-₹ तडजोडी अंती ४०००/- रुपये
▶️ लाचेची मागणी दिनांक- ता.२१/०६/२०२३
▶️ लाच स्विकारली: ४०००/- ₹
▶️लाच स्विकारली दिनांक – २१/०६/२०२३
▶️ लाचेचे कारण – यातील तक्रारदार, त्यांची पत्नी, मुलगी व मुलगा अशांवर बेलवंडी पोलीस स्टेशन गु. र. न.२०९/२०२३ भा. द. वि.३२४, ३२३,५०४, ५०६,३४ प्रमाणे दिनांक १/६/२०२३ रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात १२/६/२०२३ रोजी जामीन प्रक्रियेत मदत केली म्हणून व गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी १००००/- रुपये लाचेची मागणी करत असल्याबाबत तक्रारदार यांनी ला.प्र. वि.कार्यालय अहमदनगर कडे तक्रार नोंदविली होती त्यानुसार आज दिनांक २१/६/२०२३ रोजी पंचा समक्ष लाच मागणी पडताळणी केली असता यातील आलोसे पठारे यांनी प्रथम १००००/- लाच मागणी करून तडजोडी अंती ४०००/-रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज दिनांक २१/६/२०२३ रोजी बेलवंडी पोलीस स्टेशन येथे सापळा कारवाई आयोजित केली असता पंचा समक्ष सदर लाच रक्कम ४०००/- रुपये स्वीकारली म्हणून बेलवंडी पोलीस स्टेशन येथे त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
▶️ हैश व्हॅल्यू घेण्यात आली आहे. फोटोग्राफ्स घेण्यात आले आहेत.
▶️ सापळा अधिकारी:-
गहिनीनाथ गमे, पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. अहमदनगर मो नंबर-९८२१९१७७२२
▶️ पर्यवेक्षण अधिकारी* प्रवीण लोखंडे, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, अहमदनगर मो. नंबर :- ८००७६७९९००
▶️सापळा पथक* -पोलीस अंमलदार पोशि कराड, महिला पोलीस नाईक राधा खेमनर
▶️ *मार्गदर्शक -*मा.शर्मिष्ठा घारगे- वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक, मो. नंबर- ९३७१९५७३९१, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
▶️मा. माधव रेड्डी सो अपर पोलीस अधीक्षक, मो. नंबर- ९४०४३३३०४९ ,
ला.प्र.वि नाशिक.
▶️ मा:- नरेंद्र पवार, वाचक पोलीस उपअधीक्षक, मो. नंबर ९८२२६२७२८८,ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
▶️ *आरोपीचे सक्षम अधिकारी – मा. पोलीस अधीक्षक
,अहमदनगर
•••••••••••••••••••••••-
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो, अहमदनगर
दुरध्वनी- ०२४१- २४२३६७७
@ टोल फ्रि क्रं. १०६४

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button