इंदोरी च्या प्रवरा विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी!

अकोले /प्रतिनिधी–
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अकोले तालुक्यातील इंदोरी येथील प्रवरा विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरी झाली.
यानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील महिला शिक्षिका व विद्यार्थिनींनी केले होते .कार्यक्रमाचे प्रास्तविक
श्रीमती शीतल बिबवे यांनी केले.यावेळी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक विचारांवर मनोगते व्यक्त केली.
विद्यालयाचे मुख्याध्यापक एस बी मालुंजकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सावित्रीबाई फुले यांचे विचार आजच्या मुलांमध्ये रुजविण्यासाठी आणि त्यांच्यासारखा खंबीरपणा विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील असायला हवे तसेच शिक्षण घेणे म्हणजे नोकरी मिळवणे नसून समाजासाठी दिंनदलितांसाठी आपण ठोस असे काहीतरी काम केले पाहिजे असे सांगून सावित्रीबाई फुले जयंती निमित्त अभिवादन केले .
कार्यक्रमाचे आभार सौ. हासे यांनी मानले तर सूत्रसंचालन एस एम खारके यांनी केले
कार्यक्रमास जेष्ठ शिक्षक एस एन खतोडे, एस एम खारके,आर वाय, कोंडार,एस बी मुंतोडे, जे जी वाघ,एस एम गोडे, ए एस देशमुख, पी एस देशमुख, एस व्ही,चौधरी, जेष्ठ शिक्षिका सविता मेहेत्रे, सीमा धुमाळ, शितल बिबवे, लक्ष्मी मुंढे यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते .
“”””””””