कोटा एक्सलंस सेंटरच्या विद्यार्थ्यांचे नीट, जेईई व एमएचटी-सीईटी परीक्षेत घवघवीत यश.

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
नीट,जेईई वएमएचटी- सीईटी परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून यामध्ये शेवगाव येथील कोटा एक्सलंस सेंटरच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये जेईई परिक्षेत नागरे रीया हिने ९७.९८% मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला त्याचबरोबर आहेर गौरेश याने ८४.६३% मिळवून द्वितीय तर आमटे प्रतिक ८१.४६ % मिळवुन तृतीय क्रमांक पटकावला.
नीट परीक्षेत नागरे रीया बाबासाहेब हिने ५३७ मार्क्स घेऊन तालुक्यात प्रथम राज पुरोहित सचिन ४४८ गुण मिळवून द्वितीय तर ठोंबरे गोविंद ३१० गुण मिळून तृतीय आला व रिपिटर मधून वाघमोडे गणेश हा ५४२ गुण मिळून तालुक्यातून प्रथम आला.
एमएचटी-सीईटी परीक्षेत आहेर गौरेश याने ९८.५०% घेऊन प्रथम क्रमांक मिळवला त्याचबरोबर ९० % पेक्षा जास्त गुण मिळवणारे ७ विद्यार्थी ८० % पेक्षा जास्त ६ विदयार्थी तसेच प्रथम श्रेणीत २० विद्यार्थी आले आहेत. या यशस्वी विध्यार्थ्यांचे कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष मा.डॉ.विद्याधर काकडे, मा.जिल्हा परिषद सदस्या सौ हर्षदाताई काकडे ,मुख्यकार्यकारी अधिकारी प्रा.लक्ष्मण बिटाळ सर ,आबासाहेब काकडे विद्यालयाचे प्राचार्य मा.संपत दसपुते , विभाग प्रमुख हरीश खरड , निर्मल ब्राईट फ्युचर स्कूल शेवगावचे समन्वयक सुनील आढाव सर ,प्राचार्य डॉक्टर शंकर वरखेडे डायरेक्टर मा.राजेश दारकुंडे सर , शिव अग्रवाल सर यांनी अभिनंदन केले. सन २०१८ पासून शेवगाव या ठिकाणी कोटा एक्सलंस सेंटर कार्यरत असून त्या मधून खूप विध्यार्थ्यानी एमएचटी-सीईटी ,नीट , जेईई एन.डी.ए. या सारख्या विविध परीक्षामध्ये यश मिळवले आहे. ८ वी ते १२ वी वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे .तरी ज्या विदयार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहान मा. विभाग प्रमुख श्री हरीश खरड सर ,डायरेक्टर मा.दारकुंडे सर , शिव अग्रवाल सर यांनी केले.