जिल्हा परिषदेच्या परिचर वर्ग ४ कर्मचा-यांची पदोन्नती करण्याची मागणी,

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी:-
जिल्हा परिषदेतील परिचर वर्ग ४ कर्मचारी यांची गेली पाच वर्ष परिचर वर्ग ४ मधून कनिष्ठ सहाय्यक ( लिपिक/लेखा) वर्ग ३ पदावर पदोन्नती प्रक्रिया सेवा नियम तयार नसल्यामुळे प्रलंबित होते.
ग्रामविकास विकास विभागाने सुधारित सेवा प्रवेश नियम २०२३ दि.२७ एप्रिल २०२३ चे अधिसूचनेनुसार निर्गमित केलेले असून त्या प्रमाणे ४०:५०:१०(पदोन्नती:सरळ सेवा: वाहनचालकातून नाम निर्देशनातून) पदोन्नती प्रमाण झालेले तरी या प्रमाणे पदोन्नती व्हावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटना यांनी केली आहे तसे निवेदन वेळोवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी (सर्व )यांना दिले आहे.
तथापि शासन सध्या दि. १२/०५/२०२३ व दि. ३०/०५/२०२३ च्या पत्राने पदोन्नती प्रक्रिया करताना वेळ काढू पणा करत असून सरळ सेवा प्रमाणे भरती करण्याच्या तयारीत आहे.ही बाब जिल्हा परिषदेमधील परिचर वर्ग ४ कर्मचारी यांचेवर अन्याय करणारी आहे. त्यामुळे जिल्हा परिषद परिचर कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे, म्हणून महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटनेनी अप्पर मुख्यसचिव (ग्रामविकास विभाग बांधकाम भवन मंत्रालय मुंबई) यांना दि. १९ जून२०२३ रोजी संप/ मोर्चाचे निवेदन दिलेले आहे.
त्यानुसार दि. १७ जुलै ते २१ जुलै २०२३ पर्यंत जिल्हा परिषद कार्यालयासमोर संपूर्ण कामबंद,ठिय्या
आंदोलन दि.२४ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा,दि. २५ जुलै रोजी मंत्रालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. अशा विविध मागण्यांसाठी संघटना व राज्य सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी, मध्यवर्ती महासंघ संपात/ मोर्चात सहभागी होणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे.