
अहमदनगर प्रतिनिधी-
नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे माहेश्र्वरी समाजातील बलदवा परीवार ह्यांच्या येथे दरोडा टाकून 2 जणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.हे खूप मोठे आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकले होते ,परंतु आपल्या प्रयत्नाची पराकाष्ठा करत पोलिस प्रशासनाने 48 तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या व समाजातील एक दहशत काही प्रमाणात का होईना कमी झाली त्यामुळे नगर तालुका माहेश्वरी सभा, माहेश्वरी युवा संघटन, व माहेश्वरी महिला संघटन, ह्या संस्थे मार्फत जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला साहेब ह्यांचा सत्कार करून सदरील खटला जलद गती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी असे आवाहन करून निवेदन देखील देण्यात आले, त्याप्रसंगी नगर तालुका अध्यक्ष मुकुंद धूत ह्यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना माहेश्वरी समाज हा एक शांती प्रिय समाज असून एक मोठा व्यापारी वर्ग ह्या समाजात आहे कधीही कोणाच्या आधी मधी नसणारा ह्या समाजात अशा प्रकारची घटना घडणे हे अत्यंत निषेधार्ह. आम्ही समाजाकडून त्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो असे सांगितले. याप्रसंगी सुरेश चांडक, जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर बिहाणी, जिल्हा सचिव अतूल डागा, मोहनलाल मानधना, मनिष सोमाणी, युवा संघटन अध्यक्ष ॲड शाम भुतडा, महिला संघटन अध्यक्ष गीता गिल्डा, सुरेखा मणियार ,माधुरी सारडा, सुरेश सिकची, बालकिसन बंग व समाजातील इतर मान्यवर उपस्थित होते.
