अहमदनगर

कोरठण खंडोबाची भक्त श्रुतिशा पटाडे हिची प्रशासकीय सेवेत झालेली निवड प्रेरणादायी-अॅड.पांडुरंग गायकवाड

दत्ता ठुबे

              पारनेर-कुलदैवत श्री क्षेत्र कोरठण खंडोबाची भक्त असलेली आणि क्षेत्र पंढरपूर आळंदीची सलग बारा वर्षे वारी करणारी वारकरी कन्या कुमारी श्रुतिशा सुभाष पटाडे राहणार बोरी बुद्रुक,तालुका-जुन्नर,जिल्हा-पुणे ही नुकतीच सन 2022-23 ची यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली. 
                   यूपीएससी परीक्षेत श्रुतिशा ऑल इंडिया 281 रँकवर उत्तीर्ण झाली असून तिचे हे यश इतरांना प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन कोरठण खंडोबा देवस्थानचे पिंपळगावरोठा,तालुका-पारनेर,जिल्हा-अहमदनगर माजी अध्यक्ष आणि विद्यमान विश्वस्त अॅड. श्री. पांडुरंग गायकवाड यांनी केले आहे. पटाडे परीवाराच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात अॅड. गायकवाड बोलत होते.

         श्रुतिशाचे कुलदैवत कोरठण खंडोबा असून वडील  सुभाष खंडू पटाडे आणि आई सविता सुभाष पटाडे कोरठण खंडोबा,पंढरपूर,आळंदीची वारी दरवर्षी करतात. श्रुतिशा सुद्धा गेले बारा वर्षे सलग कोरठण खंडोबा,आळंदी, पंढरपूरची वारी करीत आहे.वारकरी सर्वसामान्य कुटुंबातील श्रुतिशाने शालेय शिक्षणापासूनच टॉपर होण्याचा मान मिळवला आहे.
             सन 2010 मध्ये एसएससी परीक्षेत 93 टक्के गुण आणि गणित विषयात 150 पैकी 150 गुण घेऊन बोर्डात टॉपर, सन 2012 मध्ये बारावी परीक्षेत 91 टक्के गुण घेऊन फिजिक्स, केमिस्ट्री, गणित मध्ये नवी मुंबईतून टॉपर, 2016 मध्ये VJTI मधुन मेकॅनिकल इंजिनिअर,सन 2020 मध्ये एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन उपजिल्हाधिकारी, सन 2020 मध्येच यूपीएससी तर्फे घेतलेल्या इंडियन पोस्टल टेलिकॉम अकाउंट आणि फायनान्स परीक्षेत उत्तीर्ण, टेलिकॉम विभागात उपायुक्त पदावर सेवा,सन 2022-23 मध्ये पुन्हा यूपीएससी आयएएस परीक्षा ऑल इंडिया 281 रँकवर उत्तीर्ण होऊन भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली आहे. वारकरी कुटुंबातील कन्येचे यश,चिकाटी, ध्येय,मेहनत,जिद्द इतरांना प्रेरणादायी आहे असे अॅड.पांडुरंग गायकवाड यांनी श्रुतिशाचा सत्कार करताना म्हटले आहे. 

                 देवस्थानचे सर्व विश्वस्त मंडळ,भाविक भक्त,यात्रेकरू, वारकरी तसेच जनतेच्या वतीने श्रुतिशाला शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button