पारनेर तालुक्यातील पळवे खुर्द येथील गोरक्षनाथ गाडिलकर यांची जिल्हाधिकारीपदी निवड

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी:
पळवे खुर्द येथील रहिवासी असलेले गोरक्षनाथ गाडीलकर हे पारनेर तालुक्यातील असून 1996 मध्ये ते उपजिल्हाधिकारी पदी रुजू झाले. त्यांनी अहमदनगर येथे जिल्हा पुनर्वसन अधिकारी, रोहयो उपजिल्हाधिकारीपदी काम पाहिले. बुलढाणा येथे निवासी उपजिल्हाधिकारी, अमरावती येथे भूसंपादन, तर मोर्शी येथे प्रांताधिकारी म्हणूनही काम पाहिले.गोरक्षनाथ गाडीलकर सध्या नागपूर व धुळे येथील जात पडताळणीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत तसेच गोरक्षनाथ गाडीलकर हे एक शेतकरी कुटुंबातील आहेत. गावात आल्यावर ते अनेकांच्या समस्या ही सोडवण्याचं नेहमी काम पाहत असतात. त्यामुळे पळवेकरांचे एक भूषण आहेत. त्यांची जिल्हाधिकारी पदी निवड झाल्यामुळे पळवे खुर्द,पळवे बुद्रुक, तसेच पंचक्रोशीतून त्यांच्यावरती अभिनंदनचा वर्षाव झालेला दिसून येत आहे.