अकोल्यात औंढापट्टा राघोबाची खांडी येथे वाघबारस साजरी.

एस के जाधव
कोकणवाडी दि 18 -अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील व नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या राघोबाची खांडी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सत्यभामा केटरर्स यांचे मालक श्री सोमनाथ भांगरे त्यांच्या पत्नी माधुरी भांगरे व सहकारी यांच्या सहकार्याने वाघबारस साजरी करण्यात आली.
वाघबारस हा आदिवासी समाजाचा एक महत्त्वाचा सण आहे. या सणाचा विसर पडू नये तसेच आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांनी या ठिकाणाहून बंडाचा झेंडा उभारला म्हणून राघोबाची खांडी प्रसिद्ध आहे.

आदिवासी समाज हा निसर्गाची पूजा करणारा आहे. या समाजाचे दैवत जल, जंगल, पाणी हे आहेत. निसर्गातील वृक्षवेली,पशुपक्षी, डोंगर ही आपली श्रद्धास्थाने मानून त्यांचे रक्षण करीत आलेला आहे. वाघोबाची पूजा करून दिवाळी सणाची सुरुवात होते. निसर्गातील प्राण्यांना आपला देव मानून, निसर्गातील प्राण्यांची पूजा करून निसर्गाप्रती असलेली श्रद्धा व निष्ठा आदिवासी बांधव विविध सणांच्या माध्यमातून व्यक्त करत असतो.

” वाघ्या वाघ्याची घुर, वाघ्याला निवदाची खीर” असे म्हणत वाघोबाला खिरीचा नैवेद्य दाखवण्यात आला.
यावेळी सोमनाथ इदे, ज्ञानेश्वर जाधव, संपत बेंडकोळी, संदीप बेंडकोळी,संदीप भांगरे, नितीन इदे, वैभव बेंडकोळी, सागर भांगरे, निलेश भांगरे उपस्थित होते.


