पारनेर तालुक्यातील पिंपळगाव तुर्कचे शिक्षक भानुदास शिंदे शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

पारनेर:-संजीवनी फाउंडेशन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील अण्णाभाऊ साठे सभागृह सिन्नर येथे शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. “सन्मान निष्ठेचा गौरव कर्तुत्वाचा” संस्थेच्या या ब्रीद वाक्यानुसार कर्तुत्वाच्या पंखांना लढण्याची उमेद मिळावी या उद्देशाने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन वामनराव मु्रांजन कनिष्ठ महाविद्यालय मुलुंड येथे कार्यरत असलेले व पारनेर तालुक्यातील पिंपळगाव तुर्कचे महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य सहसचिव भानुदास शिंदे यांना माजी मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारांतर्गत शिंदे यांना सन्मानचिन्ह गौरव, पदक व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.ज्ञानेश्वर सानप हे होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट् जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे उपस्थित होते.सामाजिक शैक्षणिक क्रीडा व सांस्कृतिक अशा विविध स्तरांतून भानुदास शिंदे यांचे कौतुक होत आहे.