आंबित धरणाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी केले जलपूजन

पावसाची संततधार सुरूच
पिंपळगाव खांड धरण भरण्याच्या मार्गावर
अकोले प्रतिनिधी
हरिचंद्रगडाच्या कुशीतुन वाहणाऱ्या मुळा नदीवरील पहिले धरण म्हणजे अंबित धरण हे धरण पहिल्या पावसात भरून वाहू लागले आहे यामुळे मुळामाई ओसंडुन वाहू लागली आहे
या नदीवरील 193 दल घन फूट क्षमता असणाऱ्या अंबित धरणाच्या जलाशयाचा शासकीय जलपूजन समारंभ आज शुक्रवारी आमदार डॉ किरण लहामटे यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी अगस्ती कारखान्याचे संचालक जेष्ठ नेते यमाजी लहामटे गुरुजी, नायब तहसीलदार बाळासाहेब मुळे, जलसंपदाचे अधिकारी अभिजित देशमुख कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती भानुदास तिकांडे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रकाश नाईकवाडी, अमृतसागर दुध संघाचे संचालक शरदराव चौधरी, सुरेश गडाख, राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला तालुका अध्यक्ष स्वातीताई शेणकर, जिल्हा उपाध्यक्षा निताताई आवारी, मार्केट कमिटीचे संचालक ईश्वर वाकचौरे, बबलू देशमुख, अमित नाईकवाडी, रवी आरोटे, डॉ.अभिजित देशमुख,संतोष बोटे, ग्रामसेवक किरण सगभोर, सोमा कोंडार, संदीप धादवड, निवृत्ती धिंदळे आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. अगस्ती कारखान्याच्या व्हाईस चेअरमन व जिल्हा परिषद सदस्य सुनीताताई भांगरे यांनी काल गुरुवारी या आंबित धरणाचे जलपूजन केले होते यानंतर आज आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते शासकीय जलपूजन करण्यात आले

मुळा नदीवरील अकोले तालुक्यातील हा पहिला प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने या धरणातील पाण्याचा प्रवाह पिंपळगाव खांड धरणात स्थिरावत आहे 600 दलघफू क्षमतेचे पिंपळगाव खांड धरण देखील आता भरण्याच्या मार्गावर आहे धरणातील पाणीसाठा फुगवट्या मुळे अकोले -कोतुळ मार्गावरील कोतूळ पूल पाण्याखाली गेला आहे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने पिंपळगाव खांड पांगरी मोग्रस, धामणगाव घाट मार्गे कोतुळ अशी वळविण्यात आली आहे पिंपळगाव खांड धरण लवकरच ओव्हरफलो होऊन पाण्याचा हा प्रवाह मुळा धरणाकडे झेपणार आहे