इतर

शिरुर नगर रोडची दुरावस्था थांबवा अन्यथा टोल नाक्यावर आंदोलन करण्याचा इशारा…

मनसे पारनेर तालुका उपाध्यक्ष रविश रासकर यांचा इशारा


पारनेर:- शिरूर नगर रोडवर साईड पट्टे न राहिल्यामुळे रस्त्यावर रात्री वळणावर रोडचा अंदाज येत नसल्याने गाड्यांचा खूप मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. रस्त्यालगत गावच्या ठिकाणी सूचनाफलक व क्रॉसिंग लाईटींग नसल्याने गावात जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांचा मोठ्या प्रमाणावर अपघात होतो.
शिरूर नगर रोडवर कुठेही वाहनांचा अपघात झाल्यास त्यांच्याकडे क्रेन आणि ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध नाहीत. रस्त्याच्या मध्यवर्ती ठिकठिकाणी अनाधिकृत डिव्हायडर फोडलेली असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहनांचा अपघात होतो त्याकडेही चेतक एंटरप्रायजेसने लक्ष दिले नाही. नगर शिरूर रोडवर कुठल्याही खास सुविधा नाहीत.रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने येणा-या जाणा-या वाहनांकडून मात्र भरमसाठ टोल व्यवस्थापन वसूल करत आहेत.
ज्याप्रमाणे टोलनाका व्यवस्थापक वाहनांकडून टोल वसूल करतात त्याप्रमाणे त्यांनी रस्त्यावर सुविधा पण दिल्या पाहिजेत. रस्त्यावर झालेली दुरावस्था लवकरात लवकर १५ दिवसांच्या आत जर व्यवस्थित केली नाही आणि रस्त्यावर अत्यावश्यक सुविधा भेटली नाही तर मनसे स्टाईलने टोलनाक्यावर तीव्र खळखट्याक आंदोलन करण्यात येईल असे निवेदन सुपा टोलनाका, सुपा पोलिस स्टेशन, सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर यांना मनसे तालुका उपाध्यक्ष रविश रासकर यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button