जखणगाव येथे गुरुपौर्णिमेनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन

दत्ता ठुबे
नगर प्रतिनिधी:-
प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी(खातगाव),
सिव्हिल हॉस्पिटल आयुष विभाग ,
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज विळदघाट,
आश्विन आयुर्वेद कॉलेज मांचीहील,
अल अमीन युनानी मेडिकल कॉलेज मालेगाव, योगविद्याधाम नाशिक व
डॉ. गंधे हॉस्पिटल जखणगाव यांचे संयुक्त विद्यमाने
गुरुपौर्णिमेनिमित्त
मोफत महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
सोमवार दि.३ जुलै२०२३रोजी
सकाळी ९ ते १वाजेपर्यंत
सभागृह जखणगाव ता. जि. अहमदनगर येथे
वैद्यकीय क्षेत्रातील सर्व शाखांचे (अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी,योग व निसर्गोपचार) मोफत वैद्यकीय तपासणी व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे.हे शिबीर आरोग्य ग्राम संकल्पनेतून वैद्यकिय क्षेत्रातील सर्व पॅथी एकाच छताखाली एकाच वेळी आणुन रुग्णावर सर्व तज्ञ डॉक्टरांनी समन्वयाने उपचार करावा या हेतुने जगातील हा पहिलाच प्रयोग व पहिलेच शिबीर आहे. शिबिराचे उद्घाटन
मा.खा.डॉ.सुजयदादा विखेपाटील यांच्या हस्ते व
मा.मंत्री.श्री. शिवाजीराव कर्डिले
यांच्या अध्यक्षतेखाली
जखणगाव येथील हटकेश्वर मंदिर परिसरात ३/७/२०२३ रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे.तरी सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे तसेच सर्व गरजु लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.
शिबिराची वैशिष्ट्ये-
या शिबिरात स्त्रीरोग, प्रसूतीशास्त्र,(स्तनाचे आजार), अस्तिरोग (मणक्यात गॅप, फ्रॅक्चर, वात), हृदयरोग, शल्यचिकित्सा,(मूळव्याध,मुतखडा,अपेंडिक्स लिव्हर आजार), फिजिशि यन (दमा,बीपी, हृदयरोग, डायबेटिस, किडनी, संधीवात, चक्कर,पित्त,अल्सर, फिट येणे)बालरोग,नेत्ररोग,(मोतीबिंदू,काचबिंदू, चष्म्याचा नंबर, तिरळेपणा, रांजणवडी)या व अशा सर्व आजारांवर गरजेप्रमाणे शस्त्रक्रिया,एलोपॅथी उपचार,आयुर्वेदिक औषधे, युनानी हकीम ईलाज, निसर्गोपचार व होमिओपॅथिक औषधोपचार मोफत केले जातील.
ऑपरेशन व पुढील महागड्या तपासणी विखे पाटील हॉस्पिटल विळदघाट येथे मोफत केल्या जातील.हे शिबीर सर्वांसाठी खुले असुन पेशंटने येताना शक्यतो आपले जुने रिपोर्ट व फाईल सोबत घेऊन याव्यात. सकाळी ८ वाजल्यापासुन नाव नोंदनी शिबिरास्थळी सुरु होईल.या शिबिराचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन जखणगावचे लोकनियुक्त सरपंच डाॅ.सुनिल गंधे यांनी केले आहे.