अवतार मेहेरबाबा नगर सेंटरचा ६४ वा वर्धापन दिन संपन्न

नगर:- नगरमधील सरोष पेट्रोल पंपाशेजारील अवतार मेहेरबाबा नगर केंद्राचा ६३४ वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमाने उत्साहात संपन्न झाला.यावेळी सेंटरचे अध्यक्ष मेहेरनाथ कलचुरी,प्रा सुनील मांढरे,दीपक थाडे,नितीन थाडे,मधुकर डाडर व परिवार ,नीलिमा औटी,मेहेर भुज्जी,संतोष पाटसकर,श्रुती मुळे आदींसह मोठ्या संख्येने भाविक व नगरकर उपस्थित होते.
यावेळी मेहेरप्रेमींनी भजन,आरती,प्रार्थना,सुगम संगीत गायन,शास्त्रीय व भक्तीगीत गायन,वादन,कव्वाली गायन,भजने व अभंग वाणी तसेच नृत्य इ.कार्यक्रम सादर केले.
डॉ.मेहेरनाथ कलचुरी यांनी यावेळी सेंटरची स्थापना व बाबांच्या कार्याविषयी माहिती दिली.ते म्हणाले बाबांचे जगात सेंटर होते पण नगरमध्ये नव्हते तेव्हा मेहेरबाबांनी सेंटर स्थापन करण्याची सूचना केली मग मेहेरप्रेमींच्या घरी दर शनिवारी सेंटर सुरु करावयाचे ठरले.पहिला प्रोग्राम माणिक हाथीदारू यांच्या येथे झाला मग शास्त्री मॅडम,भगीरथ तिवारी आदी मेहेरप्रेमींच्या घरी सेंटर झाले. असे २० जून पर्यत प्रोग्राम झाले.
पण त्याकाळी वाहनांची व संवादाची सुविधा जास्त नव्हती त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जाणे शक्य नव्हते मग आदी इराणी यांना जागा मागण्यात आली त्यांनी सरोष पेट्रोल पंपाशेजारील या जागेतील एक खोली दिली. २९ जूनला सेंटर भरून पहिला प्रोग्राम झाला व सेंटर सुरु झाले. या सेंटरचे उदघाटन अवतार मेहेरबाबांनी केले होते त्यावेळी ५०० लोक उपस्थित होते असे कलचुरी म्हणाले.
नंतर आरती,प्रार्थना करण्यात आली व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.