सेनापती बापट विद्यालयात विद्यार्थी, शिक्षक व पालक पायी दिंडी सोहळा

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री हरि विठ्ठल आषाढी एकादशीचे औचित्य साधुन बुधवारी सेनापती बापट विद्यालयात अभ्यासपुरक नवोक्रमांतर्गत विद्यार्थी, शिक्षक व पालक पायी दिंडी सोहळा पार पडला
सदर सोहळ्याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पडोळे सरां सहीत सर्व अध्यापक वर्गाने विठ्ठल गीतांसह, फुगडी खेळण्याचा आनंद विद्यार्थ्यां सोबत घेतला. विद्यालयतील सर्वच विद्यार्थी विद्यार्थीनी वारकरी संप्रदायाचा पोषाख परिधान करून आले होते. तसेच इ. ५ वी ते इ. ७ वी मधील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रूक्मिणी, ज्ञानदेव, मुक्ताबाई, संत तुकाराम, संत जनाबाई इ.
वेशभुषा धारण केल्या. पालखी, दिंडी पताका, झेंडे तसेच जय हरी विठ्ठल नाम गजरात पारनेर परिसर दुमदुमला.
दिंडी सेनापती बापट विद्यालयाच्या प्रांगणातुन मार्गस्थ झाली नवीपेठ मार्गे विठ्ठल मंदिराकडून पुन्हा विद्यालयात दाखल झाली. विद्यालयात रिंगण सोहळा पार पडला.
हरी नामाच्या जयघोषात विठ्ठलाच्या नामगजरात अत्यंत उत्साही वातावरणात विद्यालय परिसर बहरून मंत्रमुग्ध झाला. सर्व बालचमुंनी दिंडीचा आनंदोत्सव विद्यालयात साजरा केला पारनेर परिसर व शहरातील सर्व पालकांनी व नागरिकांनी दिंडीचे स्वागत व कौतुक केले.