जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकदरे येथे शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न.

अकोले/प्रतिनिधी-
अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकदरे येथे शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. पुढील शैक्षणिक वर्ष सन २०२३ -२४ मध्ये इयत्ता पहिली मध्ये प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या मेळावाचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्याच्या प्रसंगी प्रभात फेरी काढण्यात आली.
याप्रसंगी माजी सरपंच विकास भांगरे, गोरख भांगरे, अजय भांगरे,यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याचे उद्घाटन केले. विद्यार्थ्यांची नाव नोंदणी करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले विद्यार्थी विकास पत्र भरून मुलांचा शारीरिक बौद्धिक सामाजिक व भावनात्मक विकास तसेच भाषा विकास व गणन पूर्वतयारी याची पडताळणी मेळाव्यात करण्यात आली.
सदर मेळाव्यात गावातील बहुसंख्य पालक आपल्या पाल्यास घेऊन उपस्थित होते. मेळावा यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक भोरू मेंगाळ,अंगणवाडी सेविका वेणूबाई भांगरे,सविता भांगरे आशा स्वयंसेविका,योगेश भांगरे सरपंच एकदरे,विकास भांगरे माजी सरपंच एकदरे,गोरख भांगरे,अजय भांगरे,रामदास भांगरे,पोपट भांगरे, नामदेव भांगरे, व पालक वर्ग गावातील सर्व तरुण व ग्रामस्थ, पालक वर्ग उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक भोरु मेंगाळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर माजी सरपंच विकास भांगरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
