इतर
जखणगांव सेवा सोसायटीच्या व्हाईस चेअरमन पदी बाळकृष्ण कर्डिले गुरुजी यांची निवड

पारनेर प्रतिनिधी
जखणगांव ता नगर येथील भाऊसाहेब लक्ष्मण कर्डिले सेवा सोसायटीचे काम हे जिल्ह्यात अव्वल आहे या सोसायटीचा वसुल १००℅ आहे. सोसायटीच्या संचालक मंडळाची बैठक चेअरमन बाळासाहेब कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीत ज्येष्ठ संचालक व आदर्श शिक्षक बाळकृष्ण कर्डिले गुरुजी यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल जखणगांव चे लोकनियुक्त सरपंच डॉ. सुनिल गंधे यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला व ग्रामविकासाठी काम करण्याचे आवाहन केले.
यावेळी पोलीस पाटील रमेश आंग्रे, तात्या कर्डिले, भाऊसाहेब कर्डिले, शिवाजी कर्डिले, संपत लोढा,हलिम शेख,गेनुभाऊ कर्डिले,राजेंद्र ठाणगे यांचे सह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.