डाॕ.डी.वाय. पाटील महाविद्यालयाचे रासेयोचे विशेष हिवाळी शिबिर

डाॕ.डी.वाय. पाटील महाविद्यालयाचे रासेयोचे विशेष हिवाळी शिबिर पार पडले
पुणे दि 28 ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, डाॕ.डी.वाय.पाटील युनिटेक सोसायटीचे, डाॕ.डी.वाय पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे शेलारवाडी येथे सात दिवसाचे विशेष हिवाळी शिबिर पार पडले.
या शिबिराचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. पी. डी. पाटील सर, सचिव मा. डॉ. सोमनाथदादा पाटील, विश्वस्त स्मिता जाधव मॕडम आणि प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
या शिबिराच्या उद् घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे देहुरोड कटक मंडाचे माजी उपाध्यक्ष मा. श्री. रघुवीर शेलार, घोरावडेश्वर देवस्थानचे सचिव मा. श्री योगेश शेलार, मा. श्री. अमित भेगडे हे होते. सात दिवसात या विशेष हिवाळी शिबिराच्या माध्यमातून शेलारवाडी गावात आणि परिसरात अनेक कामे करण्यात आली त्यात प्रामुख्याने नदी घाट स्वच्छता, वृक्षारोपण, पाण्याच्या तळ्याची स्वच्छता, झाडांना आळी करणे अशा कामाबरोबरच घोरावडेश्वर डोंगरावरही वृक्षारोपण केले. तसेच तेथे महाविद्यालयानेच लावलेल्या अर्जुन वृक्षांना आळी करून ठिंबक सिंचन करण्यात आले. अशी अनेक कामे या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आली.
दररोज दुपारच्या जेवणानंतर विद्यार्थ्यांसाठी आॕनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेतून विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच उद् घाटन कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे रघुवीर शेलार यांनी महाविद्यालयाचा रासेयो चे स्वयंसेवक करत असलेल्या कामाचे कौतूक केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयाने आतापर्यंत केलेल्या कामाचा आणि या पुढे करणार असलेल्या कामाचा आढावा घेतला.
या शिबिरातील सर्व कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा गणेश फुंदे, रासेयो विभागीय समन्वयक प्रा. डाॕ. मिनल भोसले प्रा. खलिद शेख, प्रा. भागवत देशमुख प्रा. हेमल ढगे यांनी काम पाहिले. तसेच विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डाॕ. मुकेश तिवारी, प्रा.डाॕ. विजय गाडे यांचेही मोलाचे योगदान दिले.
या शिबिरासाठी शेलारवाडी ग्रामस्थ, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
.
