चंद्रशेखर घुलेंच्या पाठीशी ताकदीने उभे रहा – शंकरराव नारळकर

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
आगामी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी शेवगाव – पाथर्डी मतदार संघातील घुले कुटुंबीयांवर श्रद्धा व प्रेम असणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी शेवगाव -पाथर्डी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांसह हितचिंतकातील उत्साह शिगेला पोहोचला आहे. नुकताच माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांचा वाढदिवस मतदार संघात मोठ्या उत्साहात विविध उपक्रम राबवत साजरा करण्यात आला. आता या पुढील काळात ही कार्यकर्त्यांनी चंद्रशेखर घुले पाटील हाच पक्ष समजून घुले पाटील यांच्या मागे आपली ताकद उभी करावी अशी मागणी शेवगाव तालुका धरणग्रस्त कृती समितीचे तथा भातकुडगावचे माजी सरपंच शंकरराव नारळकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
शेवगाव – पाथर्डी मतदार संघाच्या तुलनेत शेवगाव तालुक्यातील प्रलंबित प्रश्न वीज, पाणी रस्ते व मुळा धरणातील पाणी टेलच्या भागापर्यंत मिळाले पाहिजे यासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेणारे धरण क्षेत्रातील वीज व पाणी या प्रश्नाची उकल करण्यासाठी व भविष्यात शेवगाव तालुक्यात एम आय डी सी च्या माध्यमातून तरुणांना रोजगार निर्मितीचे स्वप्न साकार करण्यासाठी माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही. शब्द प्रमाण मानून सर्वसामान्यांच्या शेतकरी वर्गासाठी सातत्याने संघर्षमय भूमिका घेऊन प्रश्न धसास लावण्याचे धाडसी नेतृत्व म्हणून चंद्रशेखर घुलेंकडे पाहिले जाते. तालुक्यातील देवस्थानचा विकासासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेऊन रचनात्मक विकास आराखडा तयार करून देवस्थाना निधी प्राप्त करून देऊन देवस्थानच्या विकासासाठी कटीबद्ध असणारे माजी आमदार नरेंद्र घुले पाटील,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले व शेवगाव पंचायत समितीचे डॉ. क्षितिज घुले पाटील यांनी शेवगाव -नेवासा राज मार्गावरील श्री क्षेत्र गुंफा येथील स्वयंभू काळेश्वर देवस्थानला क वर्ग दर्जा मिळवून देऊन देवस्थानच्या विकासात चालना दिली आहे. शेवगाव – ‘नेवासा राजमार्गावरील या देवस्थानच्या वैभवात अधिक भर पडली आहे. शेवगाव -पाथर्डी -नेवासा मतदार संघातील तरुणांसह वृद्धापर्यंत आदराची भावना असलेले मतदारसंघाच्या रचनात्मक विकासाचे व्हिजन म्हणजेच चंद्रशेखर घुले पाटील होय म्हणून त्यांच्या पाठीशी मोठ्या ताकतीने उभे राहून तर मतदार संघाच्या विकासाचे भागीदार बनवू या असेही पत्रकात म्हटले आहे.