पारनेर भूमी अभिलेख कार्यालयातील एजंटांना आवरा – योगेश कुलथे

पारनेर प्रतिनिधी :
पारनेर येथील भूमी अभिलेख कार्यालयामध्ये चाललेला खाजगी एजंटाकडून व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून चाललेला सावळा गोंधळ बंद करण्यात यावा तसेच या निवेदनात असे म्हटले आहे की आपल्या कार्यालयामध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांची खाजगी एजंटामार्फत तसेच आपल्याकडून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी त्या ठिकाणी काम करत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून इतरत्र कामाचा पैसा घेऊन तुमचे काम आम्ही करून देतो असे सांगून त्यांच्याकडून बेजुबाबी पैसा उकळत आहेत तरी अशा कर्मचाऱ्यांना व खाजगी एजंटांना आपल्या कार्यालयामध्ये येण्यास बंदी करावी अन्यथा आपल्याकडून तसे न झाल्यास आपल्या वरिष्ठांकडे निवेदन देऊन आंदोलनाच्या मार्गाचा अवलंब करावा लागेल असा इशारा भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेमार्फत देण्यात आला.भास्करराव वाघमोडे यांना निवेदन देताना भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशचे जिल्हा कार्याध्यक्ष योगेश कुलथे,सामाजिक कार्यकर्ते हिरामण रणदिवे, मानव विकास परिषद उपजिल्हाध्यक्ष बाबाजी सोनवणे, अशोक जाधव सह कार्यकर्ते उपस्थित होते.