….तर शासन आपल्या दारी कार्यक्रमातच आंदोलन करणार – शरदराव आरगडे

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हाधिकारी यांचे आदेशान्वये नेवासा तालुक्यातील प्रत्येक गावात “शासन आपल्या दारी” योजना राबविली जात आहे या बाबतचा कार्यक्रम २६ मे रोजी सौंदाळा गावात होत असुन २०२१ मधील प्रलंबित कामे पुर्ण करा अन्यथा कार्यक्रम स्थळी ग्रामस्थांसह धरणे आंदोलन करण्यात येईल असे सौदाळ्याचे मा,सरपंच शरदराव आरगडे यांनी म्हटले आहे
सौंदाळा गावातील नागरीकांना स्वस्त धान्य मिळण्यासाठी ग्रामपंचायतीने २६/१/२०२१ रोजी प्रस्ताव दिला होता त्याचा वारंवार पाठपुरावा करुन देखील अद्याप पर्यंत ग्रामस्थांना धान्य देणेचा आदेश पुरवठा शाखेकडुन मिळालेला नाही
तसेच १७ मे रोजी कुकाणा येथे पार पडलेल्या शासन आपल्या दारी योजनेच्या कार्यक्रमात सौंदाळा,कुकाणा,भेंडा,तरवडी, चिलेखनवाडी येथील सरपंचांनी हि सर्वच गावातील समस्या असुन तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली होती
सौंदाळा ग्रामस्थांचा धान्य मिळण्याचा प्रस्ताव देऊन तब्बल २ वर्ष झाले आहेत म्हणुन २६ मे शुक्रवार रोजी सकाळी ११ वा सदर धान्य सुरु करण्याचा आदेश मा तहसिलदार यांनी द्यावा अन्यथा ग्रामस्थांसह धरणे आंदोलन करुन शासनाच्या कार्यपद्धतीचे वाभाडे काढणार असल्याचे मा,जिल्हाधिकारी , मा,तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.