राहता भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी 25 हजारची लाच घेताना अँटीकरप्शन च्या सापळ्यात !
राहता दि 5 विकत घेतलेल्या जमिनीची मोजणी करून देण्यासाठी 25 000 रुपये ची लाच मागणारा भूमी अभिलेख कर्म चारी लाच लुचपत च्या सापळ्यात अडकला
अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी
विकास सूर्यभान दुशिंग याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहात पकडले
कृषिमंत्री राधाकृष्ण विखेंच्या राहता तालुक्यातच। ही शासकीय कर्मचाऱ्यांची खाबूगिरी जोरात सुरू असल्याचे समोर आले आहे तक्रारदार- पुरुष वय- ५६ रा- कोल्हार बुद्रुक, ता- राहाता,जि.अहमद नगर
विकास सूर्यभान दुशिंग, वय ५१ वर्ष, धंदा- नौकरी, भूमी अभिलेखपाल, वर्ग- ३,भूमी अभिलेख कार्यालय,राहाता,जि. अहमदनगर
राहणार- शारदा नगर,कोपरगाव जिल्हा- अहमदनगर.
लाचेची मागणी-२५०००/-₹
लाच स्विकारली २५०००/ ₹
हस्तगत रक्कम- २५०००/-रु
लाचेची मागणी -ता.०५/०७/२०२२
लाच स्विकारली-ता. ०५/०७/२०२२
.तक्रारदार यांनी सन २०१७ बाभळेश्वर बुद्रुक, ता. राहाता,जि. अहमदनगर येथील गट क्र व उप विभाग ६५ मध्ये १ हेकटर ५२ आर शेती क्षेत्र विकत घेतले होते, सदर क्षेत्राची तक्रारदार यांनी खाजगी मोजणी केली असता ३२ आर क्षेत्र कमी भरले होते, त्यामुळे तक्रारदार यांनी सदर क्षेत्राची मोजणी होणे करिता २०२२ मध्ये मा. दिवाणी न्यायालय,राहाता येथे अर्ज केला होता,त्यानुसार .मा दिवाणी न्यायालयात दिवाणी दावा क्र. १५१/२०२२ चालू होता,सदर दाव्यामध्ये मा. न्यायालयाने दिनांक ०४/०२/२०२३ रोजी च्या आदेशात उप अधीक्षक ,भूमी अभिलेख,राहाता यांना सदर जमिनीचा नकाशा व रिपोर्ट दिनांक १०/०३/२०२३ पावेतो सादर करण्यास आदेशीत केले होते ,
त्यानुसार तक्रारदार यांनी वेळोवेळी भूमिअभिलेख कार्यालय राहाता येथे जाऊन यातील आलोसे दुशिंग यांना नकाशा व रिपोर्ट तयार करून मा. न्यायालायत लवकर सादर करा या बाबत विनंती केली होती, दिनांक २०/०६/२०२३ रोजी यातील आलोसे दुशिंग यांनी नकाशा व रिपोर्ट तयार केला होता परंतु कोर्टात पाठविला नव्हता, म्हणून यातील तक्रारदार यांनी दिनांक ०२/०७/२०२३ रोजी यातील आलोसे दुशिंग यांना भेटून नकाशा व रिपोर्ट मा. न्यायालयात पाठविण्याची विनंती केली असता आलोसे दुशिंग यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांच्या बाजूने नकाशा व रिपोर्ट मा. न्यायालयात सादर करण्यासाठी २५०००/₹ लाच मागणी केली बाबत ची तक्रार आज दिनांक ०५/०७/२०२३ रोजी प्राप्त झाली होती, त्यानुसार आज दिनांक०५/०७/२०२३ रोजी भूमीअभिलेख कार्यालय,राहाता येथे पंचासमक्ष पडताळणी केली असता आलोसे दुशिंग यांनी तक्रारदार यांचेकडे मा न्यायालयात रेपोर्ट सादर करण्यासाठी पंचासमक्ष
२५०००/₹ लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले, त्यानुसार आज दिनांक ०५/०७/२०२३ रोजी भूमी अभिलेख कार्यालय,राहाता येथे सापळा आयोजित केला असता यातील आलोसे दुशिंग यांनी तक्रारदार यांचेकडून पंचासमक्ष २५०००/₹ लाच रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे।
आलोसे दुशिंग यांचे विरुद्ध राहता पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. सापळा अधिकारी प्रवीण लोखंडे पोलीस उप अधीक्षक, ला.प्र. वि. अहमदनगर सापळा पथक:-पो हे कॉ संतोष शिंदे,
पोलिस अंमलदार रविंद्र निमसे, चालक पो हे कॉ. हरुन शेख, मार्गदर्शक – मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक मा. माधव रेड्डी सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि नाशिक.नरेंद्र पवार,वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
——-•••••••••••••••••••••••—–
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो, अहमदनगर
दुरध्वनी- ०२४१- २४२३६७७
@ टोल फ्रि क्रं. १०६४