इतर

मराठी पत्रकार परिषदेच्या उत्तर नगर जिल्हा अध्यक्षपदी अमोल वैद्य यांची नियुक्ती

अकोले प्रतिनिधी: 

नगर जिल्ह्याचा विस्तार आणि व्याप्ती लक्षात घेऊन संघटनेच्या सोयीसाठी मराठी पत्रकार परिषदेने उत्तर नगर जिल्हा आणि दक्षिण नगर जिल्हा असे दोन भाग केले असून दोन्हीकडे परिषदेच्या स्वतंत्र शाखा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे..

 त्यानुसार उत्तर नगर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष म्हणून अकोले येथील सार्वमत दैनिकाचे पत्रकार अमोल  वैद्य यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी आज केली आहे..

 अमोल वैद्य हे परिषदेचे विद्यमान जिल्हा प्रसिध्दी प्रमुख असून ही जबाबदारी अन्य पत्रकारावर सोपविण्यात येत आहे.अमोल  वैद्य यांनी दोन दिवसात आपली कार्यकारिणी निवडून त्यास परिषदेची मान्यता घ्यावी अशी सूचना त्यांना करण्यात आली आहे..

उत्तर नगरमधील अकोले, संगमनेर,श्रीरामपूर, कोपरगाव, राहूरी, राहता आदि तालुक्यातील परिषदेचं संघटन मजबूत करण्याची जबाबदारी अमोल वैद्य यांच्यावर सोपविण्यात आली आहे…

अमोल वैद्य हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत आहेत.आजपर्यंत त्यांनी विविध वर्तमानपत्रांत  पत्रकार म्हणून  काम केले आहे.आजपर्यंत पत्रकारिता,सामाजिक क्षेत्रातील राज्य व जिल्हास्तरीय अनेक महत्वाचे पुरस्कार ही मिळाले आहेत.अकोले तालुका पत्रकार संघाचे  उपाध्यक्ष,सेक्रेटरी,अध्यक्ष पदही त्यांनी यशस्वीरित्या सांभाळले आहे.याशिवाय रोटरी क्लब अकोलेचे ते संस्थापक अध्यक्ष असून  14 जिल्ह्यांच्या असलेल्या  रोटरी डिस्ट्रिकट 3132 च्या पब्लिक इमेज चे चेअरमन पदाची जबाबदारी ही त्यांनी यापूर्वी पार पाडलेली आहे. अकोले तालुक्यातील सुगाव खुर्द ग्रामपंचायत चे सरपंच पदही त्यांनी भूषविले आहे.अकोले महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे सेक्रेटरी,रोटरी डिस्ट्रिक्ट वर ते काम पाहत आहेत. अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या भैरवनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे सह-शिक्षक म्हणून ते सेवेत आहेत.

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख आदी सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून .अमोल वैद्य यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत..

—/////—-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button