सावेडी उपनगरातील वसंतटेकडी परीसरातील द्वारकामाई साई मंदिराच्या १० वा वर्धापन दिन संपन्न

नगर-सावेडी उपनगरातील वसंतटेकडी जवळील संदेशनगर मधील द्वारकामाई साई मंदिराच्या १० वा वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजिलेल्या ३ दिवसीय कार्यक्रमाची सांगता आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते महाआरती व महाप्रसादाने संपन्न झाली तसेच गोरक्ष दुतारे यांचा भक्तिरंग हा हिंदी मराठी भक्ती गीतांचा सुमधुर कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते व नंतर महाप्रसाद होऊन ३ दिवसीय कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी उपमहापौर गणेश भोसले,राहुलसिंग ठाकूर,मा नगरसेवक निखिल वारे,बाळासाहेब पवार,बबलू सूर्यवंशी,दत्ताभाऊ तापकिरे,संस्थापक सुनील त्र्यबंके,अध्यक्ष योगेश पिंपळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ.जगताप म्हणाले साई मंदिरामुळे हा सर्व परिसर अध्यात्माकडे वळत आहे जो इकडे वळतो तो वाईट कर्म करत नाही तो कुटूंबाची व समाजाची प्रगती पाहतो.हा चढता आलेख आपणास पाहावयास मिळतो.सुनील महाराज त्र्यंबके व त्याचे सहकारी वर्षभर येथे विविध उपक्रम राबवित असतात त्यामुळे अध्यात्माचे हे मोठे केंद्र होत आहे.
जिथे कुठली जात नाही….जिथे कुठला पंथ नाही..जिथे कुठला पक्ष नाही…जिथे कुठला भेद नाही….जिथे कुणाची निंदा नाही…जिथे कोणाचा द्वेष नाही…जिथे आहे फक्त प्रेम आणि त्या निर्व्याज्य प्रेमात व साईंच्या उत्सवात रममाण होण्यासाठी हे मंदिर आहे असे येथे ३ दिवस विविध कार्यक्रम संपन्न झाले. पहिल्या दिवशी साईनाथ महाराजांची आरती होऊन कार्यक्रमास प्रारंभ झाला नंतर प्रसादजी शेटे महाराज यांची भजन संध्या,निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन झाले व १० वी, १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ होऊन रात्री ८ वा.महाआरती व महाप्रसाद तसेच
दुसऱ्या दिवशी साईउत्सव भव्य शोभायात्रा श्री स्वामी समर्थ मठ,गुलमोहोररोड येथून प्रारंभ करून जयहिंद चौक,शिलाविहार चौक,श्रीराम चौक,संत नामदेव चौक, नित्यसेवा कॉलनी,दूसरे नगर,द्वारकामाई साई मंदिर येथे सांगता होऊन रात्री महाआरती व महाप्रसाद झाला.मिरवणुकी मध्ये विविध वाद्यपथकासह रथातून साईंची मिरवणूक काढण्यात आली यावेळी साईंचा सजीव देखावा होता.
शेवटच्या दिवशी गुरुपौर्णिमा साईनाथ अभिषेक,महापुजा होमहवन करण्यात आली.त्याचे पौरोहित्य प्रसाद(देवा) रिंगणे यांनी केले तर संध्याकाळी गोरक्ष दुतारे महाराज यांची भजन संध्या तसेच पाद्यपुजनाचा कार्यक्रम संपन्न झाला व ३ दिवसीय कार्यक्रमाची सांगता आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते महाआरती व महाप्रसादाने संपन्न झाली.
कार्यक्रम यशश्वितेसाठी संस्थापक सुनील त्र्यबंके,अध्यक्ष योगेश पिंपळे,दीपक कुडिया,महेश टाक,सुखदेव कापडे,जितेंद्र कुमार टाक,बाबासाहेब सूर्यवंशी,प्रविण पाटोळे,सचिन खोमणे,नारायण पालवे,सचिन ठोकळ,आकाश त्र्यंबके आदींसह साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान,संदेशनगरच्या पदाधिकारी व सदस्यांनी तसेच परिसरातील तरुण मंडळांनी परिश्रम घेतले.