आजचे पंचांग व राशिभविष्य दि.११/०७/२०२३

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ २० शके १९४५
दिनांक = ११/०७/२०२३
वार = भौमवासरे(मंगळवार)
मेष
व्यावहारिक उलाढालीत तत्पर राहा. अधिकाराचा सुयोग्य वापर हाच समस्या निवारणाचा मार्ग ठरेल. कौटुंबिक जीवनातील ज्येष्ठांचे मत दुर्लक्षित करू नका.
वृषभ
योजनांना ग्रहण लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंधारात तीर मारण्याचा प्रकार करू नका. व्यावहारिक उलाढालीत कोणावरही विसंबून राहू नका.
मिथुन
कार्यक्षेत्रातील उद्दिष्टपूर्तीसाठी नवे डावपेच आखावे लागतील. मनातील नव्या कल्पना हितकारक ठरतील. नव्या ओळखीत पैशाचे व्यवहार करू नका.
कर्क
अथक प्रयत्नामुळे मनाप्रमाणे कार्यवाही करणे शक्य होईल. कार्यक्षेत्रातील छुपा विरोध कमी होईल. नोकरी-व्यवसायातील स्थान टिकवण्यात यश लाभेल, त्यामुळे उत्साह निर्माण होईल.
सिंह
ज्येष्ठांचा सल्ला कामात यश प्रदान करील. मनात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. नोकरी-व्यवसायात स्वतःचे स्थान निर्माण कराल.
कन्या
भागीदारांच्या मनातील गैरसमज दूर करा. गुणवत्तेचे प्रदर्शन करावे लागेल. आर्थिक व्यवहारातील प्रगतीत गतिरोधक येतील.
तुळ
कर्तव्यपूर्तीसाठी अथक प्रयास हाच मार्ग स्वीकारावा लागेल. कार्यक्षेत्रात प्रयत्नपूर्वक उत्साही राहून कर्तव्य पूर्ण करा.
वृश्चिक
आर्थिक व्यवहारात तडजोड स्वीकारावी लागेल. खर्चाच्या प्रसंगास सामोरे जावे लागेल. कौटुंबिक जीवनात सलोखा प्रस्थापित करावा .
धनु
कौटुंबिक जबाबदारीचे ओझे वाढणार आहे. मुलांच्या तक्रारी कानावर येतील. अनपेक्षित खर्चास कात्री लावण्यासाठी कठोर पावले उचला.
मकर
अधिकाराचा योग्य वापर करा, सहकारीवर्ग प्रोत्साहन देणार आहे. नव्या योजनांवर काम करताना मन प्रसन्न राहील.
कुंभ
व्यावहारिक बाबतीत अचूक निर्णय लाभदायक ठरतील. नव्या धोरणांचा सखोल अभ्यास करा. त्यामुळे लाभाची शक्यता वृद्धिंगत होईल.
मीन
योजनेतील अडथळ्यांची शक्यता दुर्लक्षित करू नका. उद्दिष्टांसाठी तत्त्वनिष्ठ राहून काम करा. विरोधकांच्या आक्रमकतेस वेळीच वेसण घालावी लागेल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
:
🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ २० शके १९४५
दिनांक :- ११/०७/२०२३,
वार :- भौमवासरे(मंगळवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:०१,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०७:०८,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- ग्रीष्मऋतु
मास :- आषाढ
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- नवमी समाप्ति १८:०५,
नक्षत्र :- अश्विनख समाप्ति १९:०५,
योग :- सुकर्मा समाप्ति १०:५२,
करण :- तैतिल समाप्ति ०६:२१, वणिज २९:५९,
चंद्र राशि :- मेष,
रविराशि – नक्षत्र :- मिथुन – पुनर्वसु,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- सिंह,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०३:५२ ते ०५:३० पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी १०:५६ ते १२:३५ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:३५ ते ०२:१३ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:५२ ते ०५:३० पर्यंत,
❀ दिन विशेष:
अमृत १९:०५ प., घबाड १९:०५ नं., भद्रा २९:५९ नं.,
————–
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर