पारनेरचे नगरसेवक पोहचले विधानभवनात !

”
दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेशजी लंके यांना जनसामान्य लोकांनी” नेते” पदवी बहाल केली. सध्या विधानभवनात अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आसुन पारनेरकरांच्या विविध सामाजिक मागण्या, विकास कामे मंजुर करण्यासाठी ” नेते ” प्रयत्न करत आसुन त्यांच्या या बारिक सारीक कामकाजावर चाणाक्ष पारनेरच्या जनतेची
नजर आहे. मध्यतरी त्यांना भेटण्यासाठी ग्रामीण भागातील वृद्ध शेतकरी भेटून कामाची पद्धत पाहून भारावून जात जीवाची मुंबई केली.
आता पारनेर तालुक्याचा विकास हाच आमचा ध्यास अशी पवित्रा “नेते” नी घेतली की काय असा प्रश्न पारनेर करांना पडला आहे.
आमचे” नेते” ग्रामीण नव्हे तर पारनेर शहराचा विकास करत आहेत. कोणतेही काम आसो नेते यशस्वी होतात कसे या मागचे गुढ जाणण्यासाठी पारनेरचे नगसेवक” नेते” ना भेटण्यासाठी विधानभवनात येवून भेट घेतली. विविध प्रश्नावलींची उत्तरे आमदार निलेशजी लंके यांनी देत नगरसेवकांची विधानभवनाची सैर घडवली.राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मा . उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्यासह अनेक नेतेमंडळींच्या भेटीगाठी घेत पारनेरच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली .
या भेटी साठी पारनेर नगरपंचायतचे नगराध्यक्ष विजुभाऊ औटी,उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनशेठ भालेकर, राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे ,बाळासाहेब नगरे, योगेश मते , नितीन अडसूळ , विजय भास्कर औटी, डॉ .सचिन औटी,सुभाष शिंदे, भूषण शेलार ,श्रीकांत चौरे यांसह नितीन चिकने ,महेंद्र शिदे , विकास दगाबाज सह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.