पारनेरचे लोकप्रतिनिधी स्वपक्षीय सहकारी आमदार क्षीरसागर यांचा आदर्श घेणार काय … ? रामदास घावटे

दत्ता ठुबे
पारनेर: प्रतिनिधी
बीडचे तरुण आमदार संदीप क्षीरसागर किती महत्त्वकांक्षी आहेत हे त्यांनी बंद पडलेला गजानन सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरळीत चालू करून दाखवून दिले आहे .
हा आदर्श घेण्याचे आपल्या पारनेर तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांना आम्ही साकडे घातले होते व सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली होती परंतु त्यांनी माती खाल्ली . असा आरोप सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे यांनी केला आहे
पारनेरची जीवनदायिनी समजल्या जाणाऱ्या पारनेर सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या हक्काचा होणार यासाठी आम्ही मात्र एकाकी झुंज देतच राहणार . न्यायदेवता व पारनेरकरांचे आर्शिवाद व शुभेच्छा आमच्या सोबत आहेत . लढाई आता अर्ध्यावर आली आहे असे ते म्हणाले

तालुक्यातील बागायती शेतीची नस जिवंत ठेवण्यासाठी पारनेर सहकारी साखर कारखाना पुन्हा मिळवणारचं.
एक दिवस श्री गजानन सहकारी सारखा पारनेर सहकारीचा सोन्याचा दिवस उगवेल हा या नवीन वर्षांचा संकल्प …
लवकरच आमदार संदिप क्षीरसागर यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करणार आहोत . . ..
रामदास घावटे
(पारनेर कारखाना बचाव समिती )