नगर – कर्जत- जामखेड मतदार संघातील कर्जत येथे औद्योगिक वसाहत क्षेत्र स्थापन होण्याच्या दृष्टीने औद्योगिक विकास विभागामार्फत सर्वेक्षण झालेले आहे तसेच जामखेड व शेवगाव विधानसभा मतदारसंघात नवीन औद्योगिक वसाहत व्हावी त्यासंदर्भात ही आपण निर्णय घ्यावा. येथे औद्योगिक वसाहत तयार झाल्यास या दोन्ही मतदारसंघात विकासाला चालना मिळेल.कर्जत येथील असणा-या क्षेत्रात औद्योगिक विकास क्षेत्रास मान्यता यांना आपण मंजुरी द्यावी तसेच जामखेड व शेवगाव येथील नविन औद्योगिक वसाहत होण्यास मान्यता द्यावी अशी मागणी शिवसेनेचे अहमदनगर दक्षिण जिल्हा प्रमुख बाबुशेठ टायरवाले यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शिवसेना कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख दिपक जंजीरे पाटील उपस्थित होते. यावर मंत्री सावंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सीईओ यांना तपासून कार्यवाही करावी असा आदेश दिला आहे.दिपक जंजीरे म्हणाले यामुळे तालुक्यातील बेरोजगारी कमी होईल व युवकांच्या हाताला काम मिळेल व तालुक्याच्या विकासाला चालना मिळेल.