समता कनिष्ठ महाविद्यालयाचे तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत यश

संगमनेर/ प्रतिनिधी
समता विद्या मंदिर व शिल्पवेत्ता मधुकरराव संतुजी थोरात कनिष्ठ महाविद्यालय जोर्वे यांचे संगमनेर तालुकास्तरीय पावसाळी कबड्डी स्पर्धेत तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला (19 वर्ष वयोगट) या मध्ये खंडेराव पाटील खेमनर ओझर या विद्यालयात आयोजन करण्यात आले होते. विजयी संघाचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यातआला. सौ. शालिनीताई देशमुख (इंदुरीकर), यांच्या हस्ते व तालुका क्रिडा अधिकारी मा.श्री मोहरे साहेब याच्या उपस्थितीत मा. प्राचार्य श्री मच्छिंद्र गोसावी यांच्या हस्ते विजयी संघास ट्रॉफी प्रदान करण्यात आली
.यावेळेस विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री रोहीदास बागडे , कनिष्ठ विद्यालयाचे समन्वयक प्रा.सोमनाथ गोसावी , क्रिडा शिक्षका श्रीम.रंजना काकड, श्री यशवंत दिघे , श्रीसंदीप कानवडे ,श्री रामदास कानवडे उपस्थित होते. विजयी संघाचे व मार्गदर्शन करणारे शिक्षक याचे संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.नंदकुमार झावरे साहेब,उपाध्यक्ष मा.श्री. रामचंद्र दरे साहेब, सचिव मा.श्री. जी.डी. खानदेशे साहेब, सह सचिव श्री.अॕड. विश्वासराव आठरे साहेब, खजिनदार मा.श्री.विवेक भापकर साहेब, ज्येष्ठ विश्वस्त मा.श्री.डॉ.सी.के.मोरे साहेब, विश्वस्त मा.श्री.जयंतराव वाघ साहेब,.मा. प्राचार्य, पर्यवेक्षक,” शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.