अकोल्यातील प्रवरा पतसंस्थेच्या चेअरमन पदी भास्कर मंडलिक याची तर व्हाईस चेअरमन पदी संजय गीते बिनविरोध

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुका कार्यक्षेत्र असणाऱ्या अकोले येथील प्रवरा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी भास्करराव रामभाऊ मंडलिक तर व्हाईस चेअरमनपदी संजय बाळासाहेब गीते यांची आज निवड करण्यात आली
सहाय्यक निबंधक कार्यालयाचे सहकार अधिकारी श्री पी जी साळवे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली
भास्करराव मंडलिक यांच्या नावाची सूचना अगस्ती कारखान्याचे संचालक व संस्थेचे संचालक बाळासाहेब ताजने यांनी मांडली त्यास संजय गीते यांनी अनुमोदन दिले तर व्हाईस चेअरमन पदा साठी संजय गीते यांच्या नावाची सूचना हिंमत मोहिते यांनी मांडली त्यास लहानू मंडलिक यांनी अनुमोदन दिले संस्थेचे चेअरमन संतू भरीतकर यांनी आजारपणामुळे राजीनामा दिल्याने नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली
यावेळी अगस्ती कारखान्याचे संचालक गुलाबराव शेवाळे , माजी संचालक व संस्थेचे संचालक रामनाथ शिंदे, बांधकाम व्यावसायिक हिम्मत मोहिते प्रसिद्ध व्यापारी संजयकुमार बळकट ,भागवत त्रिभुवन, मनीषा ताजने रंजना मंडलिक, आदी संचालक ,व्यवस्थापक शिवाजी भुजबळ आदी उपस्थित होते
संस्थेचे कार्यक्षेत्रात ठेवी व कर्ज वाटप या मध्यातून संस्थेने सभासदांचा विश्वास संपादन केला आहे संचालक व संचालक व सभासदांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरून संस्थेच्या प्रगतीसाठी आपण कटिबद्ध राहू असा विश्वास यावेळी नवनिर्वाचित चेअरमन भास्कर मंडलिक ,व्हा चेअरमन संजय गीते यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केला
—— ——

- ——