पेंशनर्सचा प्रश्न हाती घेणार– कारभारी शिकारे

सोनई- प्रतिनिधी
राज्यातील विविध खात्यातील सेवेतुन सेवानिवृत्त होऊन आज काडीमोड पेन्शन मिळते, ती कधी मिळते, तर कधी नाही हे थांबवण्यासाठी निरंतर व वाढीव रक्कम मिळण्यासाठी शासनाच्या दरबारी वेळप्रसंगी आवाज उठवू असा इशारा जिल्हा पेंशनर्स संघटनेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष कारभारी शिकारे यांनी दिला.
नुकत्याच पेंशनर्स संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून शिकारे यांची निवड झाल्याने त्यांचा सत्कार मारुती मित्र मंडळ व जेष्ट नागरिकांच्या वतीने करण्यात आला तेव्हा ते बोलत होते.
या प्रसंगी अध्यक्ष स्थानी अमृत काळे हे होते.प्रमुख उपस्थिती शनैश्वर देवस्थानचे माजी विश्वस्त व माजी गटशिक्षणाधिकारी अधिकारी बाळकृष्ण येळवंडे, उद्योजक शिवाशेठ बाफना,पत्रकार विजय खंडागळे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र निंबाळकर, चालक मालक संघटनेचे किशोर घावटे,आघाव गुरुजी, पाराजी जवादे,बडे मामा, मंडळाचे सदस्य घावटे, शंकरराव तेलोरे, मुरलीआप्पा बोरुडे,जाधव गुरुजी,बाबुराव शेटे,दगडू कदम,नामदेव बारस्कर,भिमाजी शिंदे,मुरलीधर गडाख,आदी उपस्थित होते.अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. दरम्यान दिवंगत सभासदांना श्रध्दांजली यावेळी अर्पण केली.
सूत्रसंचालन पत्रकार विजय खंडागळे, प्रास्ताविक प्रदीप महमीने,तर आभार एम.एम.दरंदले यांनी मानले.