
नगर-जवळील दौंड रोडवर असलेली अवतार मेहेरबाबांची धुनी सूर्यास्ताच्या दरम्यान देशातील व परदेशातील विविध भागातील ८ मेहेरप्रेमींच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली.यावेळी जाल दस्तूर,मेहेरनाथ कलचुरी,रमेश जंगले,अॅलन वॅग्नर,प्रसाद राजू,गोपी काला यांच्यासह विश्वस्त स्थानिक व देश विदेशातील हजारो मेहेरप्रेमींची उपस्थित होते. यावेळी धुनीत आपले विकार टाकण्यासाठी व धुनीच्या दर्शनासाठी रांग लागली होती सुरवातीला विविध ठिकाणावरून आलेल्या भाविकांनी भजने म्हटली व नंतर धुनी पेटवण्यात आली यावेळी अनेक मेहेरप्रेमींनी प्रसाद वाटप केले.
मेहेरबाबांनी 10 नोव्हेंबर 1925 प्रथम पावसासाठी धुनी प्रज्वलित केली होती.काही गावकरी पाऊस नसल्याने पिके धोक्यात आले आहेत या गंभीर दुष्काळाबद्दल ग्रामस्थांनी मेहेरबाबांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी धुनी पेटवली त्याच्या नंतर काही मिनिटातच पाऊस पडण्यास सुरुवात झाली.मेहेरबाबा त्यांचे शिष्य धुनीत चंदन लाकूड टाकत असत आजही तीच परंपरा चालू आहे.
मेहेर बाबांच्या आदेशानुसार धुनी लोअर मेहेराबाद येथे सूर्यास्ताच्या वेळी प्रत्येक महिन्याच्या 12 तारखेला पेटवली जाऊ लागली ती आजतागायत तेवणे सुरू आहे.
