अहमदनगर

विजय स.औटी यांचे आंदोलन हे देखावा आंदोलन ! नितीन अडसुळ

आकारण्यात आलेली कर वसुली कमी करण्याची शासनाकडे मागणी करणार -सौ.सुरेखा भालेकर

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
पारनेर नगरपंचायत मध्ये गेले काही दिवसांपासून चालु असलेले राजकीय नाट्य पाहता काल परवा पर्यंत सत्तेत असलेले नगरपंचायतीचे मा. नगराध्यक्ष विजय औटी व भाजपाचे नगरसेवक अशोक चेडे हे विरोधात गेल्यामुळे बुधवारी पारनेर नगरपंचायतच्या माध्यमातुन नागरीकांवर केलेल्या कर आकारणीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले त्यावेळी विरोधकांनी सत्ताधारी नगरसेवकांवर केलेल्या आरोपांचे खंडन करण्यासाठी गुरुवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर पत्रकार परिषदेत कालच्या आंदोलनावर खुलासा करताना नगराध्यक्ष नितीन अडसुळ यांनी सांगितले कि कालपर्यंत आ.लंके यांना दैवत समजणारे मा.नगराध्यक्ष विजय औटी यांच्या पदाच्या काळातच कर आकारणी संदर्भात बैठक झाली होती व सर्व सत्तेतील नगरसेवकांचा या गोष्टीला विरोध आसताना विजय औटी यांनी त्यावर सहीही केली होती.हे त्यांनी बुधवारी झालेल्या आंदोलनात स्वतः जाहीर केले आहे.हे सर्व जनतेला माहीत आहे मग अशा प्रकारे बोलुन नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करत जनतेची दिशाभुल करण्याचे काम औटी यांनी थांबवावे.
आ.लंके यांच्या प्रयत्नातुन पारनेरच्या शाश्वत पाणीपुरवठ्याला नाशिक येथे झालेल्या बैठकीत तांत्रिक मंजुरीही मिळाली आहे. ७३ कोटी रुपयांच्या या पाणी योजनेचे व शहराच्या प्रारूप आखाड्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे व ते फक्त आमदार साहेबांच्याच माध्यमातुन झाले आहे त्याचा कुणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असेही नगराध्यक्ष अडसुळ यांनी मा. नगराध्यक्षाचे नाव न घेता निक्षून सांगितले .
पारनेरला पाणीपुरवठा करणाऱ्या हंगा तलावात शेतकऱ्यांचे कृषी पंप बंद करण्याचे पत्र एक मे रोजी महावितरणला देऊनही वितरणाच्या गलथान कारभारामुळे त्यांनी कुठलीही कारवाई न केल्यामुळे नगरपंचायतच्या माध्यमातून एक जून रोजी आठ कृषी पंप जप्त केलेले आहे असे या वेळी पारनेर नगरपंचायतचे पाणीपुरवठा सभापती योगेश मते यांनी सांगितले.
आमदार लंके यांनी कोरोना काळात केलेल्या कार्यामुळे इतर आमदारांपैकी संपूर्ण महाराष्ट्रात परिचित झालेले आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत नाशिक येथे झालेल्या बैठकीत पारनेरच्या शाश्वत पाणीप्रश्नाला तांत्रिक मंजुरीही मिळाली आहे.पारनेरचा प्रारूप विकास आराखडा ही अंतिम टप्प्यात आला असून पारनेर शहरवासियांना येत्या काही दिवसात या दोन्हीही योजनांना अंतिम मंजुरी मिळणार आहे.शासनात समावेश झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन वगळता इतर कर्मचाऱ्यांना दहा लक्ष रुपये वेतन नगरपंचायतला भरावे लागते असा एकूण 64 लक्ष रुपयाचा आर्थिक भार नगरपंचायतवर पडतो त्यामुळे विकास फंडावर परिणाम होतो म्हणून कर आकारणी ही गरजेचे आहे परंतु अवास्तव कर आकारणीच्या विरोधात आम्ही सर्व शासन दरबारी पाठपुरावा करू व 24 जुलै पर्यंत पारनेरच्या शहरवासियांनी या करा संदर्भात हरकती घ्याव्यात.सदर बैठकीत पत्रकार परिषदेत कर आकारणी वर काम करणाऱ्या एजन्सीला पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना सकारात्मक उत्तरे देऊ न शकल्यामुळे सदर एजन्सीवर ही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तसेच कालच्या आंदोलनात मा.नगराध्यक्ष विजय औटी यांनी परकीय नेतृत्व म्हणून संबोधलेले आमदार निलेश लंके यांचे नेतृत्व यांना कालपर्यंत मान्य होते व आजच काय उपरती झाली परंतु जनता सुज्ञ आहे असेही यावेळी पाणीपुरवठा सभापती योगेश मते यांनी सांगितले.
गेल्या सहा वर्षात सात कोटी रुपयांचे काम पूर्ण झाले असून दीड कोटी रुपयांचे कामे अंतिम टप्प्यात असून पंधरा कोटीची कामे चालू होणार आहेत.माजी नगराध्यक्षांच्या कार्यकाळात मटन मार्केट व भाजी मार्केटला साध्या सुविधाही हे देऊ शकले नाहीत फक्त फोटो काढण्यासाठी नगराध्यक्ष अग्रस्थानी होते असे बांधकाम समितीचे सभापती भूषण शेलार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले तर घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छते संबंधित माहिती आरोग्य समितीच्या सभापती सौ. निता औटी व मा .सभापती सौ विद्या कावरे यांनी दिली.
विरोधकांचे बुधवारी झालेल्या आंदोलनाचे व सत्ताधारी गटावर केलेल्या आरोपांचे खंडन करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत जनतेच्या मूलभूत समस्यांच्या व पारनेर शहरवासियांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्वीही व आजही प्रयत्नशील आहोत.नगरपंचायतचा कारभार चालवताना कर आकारणी करावीच लागते परंतु ती कमी करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू व आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेरचा विकास करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असे यावेळेस उपनगराध्यक्ष सौ.सुरेखा भालेकर यांनी सांगितले तर नुकतेच सत्तेमध्ये आलेले शिवसेनेचे नगरसेवक कांतीलाल ठाणगे यांनी करासंदर्भात सांगितले की पारनेर शहर घनकचरा गाडी वाडी वस्तीवर जात नसतानाही त्यांच्यावर कर आकारला गेला त्यामुळे वस्तीवरील नागरिकांचा तीव्र संताप पहावयास मिळत आहे आम्हाला यापुढेही घनकचरा व्यवस्थापनाची आवश्यकता नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. तेव्हा नगरपंचायत प्रशासनाने घनकचरा कर वाडी वस्तीवर माफ करावा असेही ठाणगे यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्ष नितीन अडसुळ,उपनगराध्यक्षा सौ.सुरेखा भालेकर,राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर,पाणीपुरवठा सभापती योगेश मते,आरोग्य समिती सभापती सौ.निता औटी,मा . सभापती सौ.विद्या कावरे,बांधकाम सभापती भुषण शेलार,माजी सरपंच बाळासाहेब नगरे यांच्यासह सर्व नगरसेवक व कर सर्वेक्षण व आकारणी या शासकीय समितीवर कार्यरत असणारे आर एस कन्स्ट्रक्शनचे अधिकारी -प्रतिनिधी सुनिल पेंडोरे ,राज सपकाळ,नागरीकांच्या करा संदर्भात असणारा संभ्रम दूर करण्यासाठी व आपल्या हरकती नोंदवण्यात काही अडचण आल्यास संपर्कासाठी ज्यांचा नंबर आहे ते धनंजय कुरे 7020752955 नगर पंचायतचे संबंधित खात्याचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button