अहमदनगर

जोहरापूर सेवा संस्थेच्या निवडणुकीत लांडे गटाचा विजय


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी

शेवगाव तालुक्याची राजकिय राजधानी म्हणुन ओळखल्य जाणाऱ्या राजकिय दृष्टया महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या जोहरापूर विविध
कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी चेअरमन दिलीपराव लांडे पाटील यांच्या गटाचे १३ उमेदवार विजयी झाले. या विजयानंतर जल्लोष करकरून विजय साजरा करण्यात आला

यामध्ये विजयी उमेदवार कर्जदार मतदारसंघ आजीनाथ रामकिसन उगलमुगले (२०८), एकनाथ भानुदास ढगे (२०१), विलास भुजंगराव लांडे (२०१), सुरेश तुकाराम पंडित (२००), अशोक पंढरीनाथ उगलमुगले,(१९९),बडधे मनोज पांडुरंग (१९९), आसाराम सखाराम खेडकर (१९७), बाळासाहेब काशिनाथ देवढे (१९७), अनुसूचित जाती जमाती – भाऊसाहेब लक्ष्मण जाधव (२०९), महिला राखीव –
चंद्रकला अशोक कुसारे (२०७) सुमनबाई धोंडीराम ढगे (२०५) इतर मागासवर्गीय – भाऊसाहेब नारायण विधाटे (बिनविरोध ), विशेष मागासप्रवर्गातून -रमेश भास्करराव बडधे (२१५) हे उमेदवार विजयी झाले. विजयी उमेदवाराचे सर्वच स्तरातुन स्वागतासह जेष्ठ नेते दिलीपराव लांडे व ग्रामीण पत्रकार संघाचे रविंद्र उगलमुगले यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जी. ए. विखे यांनी काम पाहीले. तर त्यांना सहाय्यक निबंधक व्ही. यु. लकवाल, संस्थेचे सचिव आबासाहेब ढवळे यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button