आंबड येथेअंबिका विद्यालयात विद्यार्थांना मोफत वह्यांचे वाटप

अकोले प्रतिनिधी :-
अकोले तालुक्यातील अंबड येथील अंबिका माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना अमृत फाउंडेशन ठाणे यांच्या वतीने नुकतेच वह्यांचे वाटप करण्यात आले
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतील एक मिनिट महाराष्ट्रासाठी एक मिनिट स्वच्छतेसाठी अभिमान महाराष्ट्राचा माझी शाळा स्वच्छ व सुंदर आमची शाळा मी कुठेही थुंकणार नाही प्लास्टिकचा वापर करणार नाही कचरा कुंडीमध्येच टाकणार माझा गाव स्वच्छ व सुंदर ठेवणार तसेच सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे या शासनाच्या अभियाना अंतर्गत बाळासाहेबांची शिवसेना शाखा ठाणे येथील परिवहन सेवेचे माजी सभापती अनिल चिंतामण भोर यांच्या सौजन्याने ठाणे जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष डॉ जालिंदर भोर तसेच इतर मान्यवरांच्या शुभहस्ते शाळेच्या २५० विद्यार्थ्यांना ५०० मोफत वह्यायांचे वाटप करण्यात आले
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संस्थेचे अध्यक्ष गिरजाजी जाधव यांनी भूषवले यावेळी विद्यार्थ्यांना ठाणे जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर जालिंदर भोर तसेच अकोले तालुका शिवसेना प्रमुख संजय वाकचौरे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी ठाणे जिल्हा डॉक्टर असोसिएशनच्या वतीने २०२३ या वर्षीचा ठाणे जीवन गौरव पुरस्कार गावचे सुपुत्र डॉक्टर जालिंदर भोर यांना मिळाल्याबद्दल अंबिका माध्यमिक विद्यालयाच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष गिरजाजी जाधव यांनी अमृत फाउंडेशनचे सभापती अनिल भोर यांचे विशेष आभार मानले
या कार्यक्रमासाठी शिर्डी संस्थानचे विश्वस्त डॉक्टर जालिंदर भोर संजय वाकचौरे बाळासाहेबांची शिवसेना तालुका उपाध्यक्ष निलेश नाईकवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य दगडू जाधव सोसायटीचे व्हाईस चेअरमन कैलासराव कानवडे श्री दत्त संस्थेचे माजी चेअरमन केशवराव मालुंजकर अजाबा कानवडे रमेश जाधव रामचंद्र हासे भास्कर भोर नितीन जाधव अमोल कानवडे अरुण भोर नवनाथ भोर राजेंद्र भोर शाळेचे मुख्याध्यापक आर टी जाधव सह शिक्षक डी ए भोर सर सय्यद सर कैलास कोते सर कैलास लोटे सर लाहूरे सर मनीषा देशमुख मॅडम भोर मॅडम क्लार्क अण्णासाहेब कानवडे शिपाई संजय कोल्हाळ तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
