रोटरी क्लब ऑफ नाशिकचा रविवारी पदग्रहण सोहळा
स्टेट बँक ऑफ इंडियाचे संचालक सीए प्रफुल छाजेड आणि प्रांतपाल मोहन पालेशा यांची उपस्थिती
नाशिक : रोटरी क्लब ऑफ नाशिकचा पदग्रहण सोहळा रविवारी (दि.१७) रोजी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मावळते अध्यक्ष डॉ. श्रिया कुलकर्णी अध्यक्षपदाची सूत्रे नवनिर्वाचित अध्यक्ष सीए प्रफुल बरडिया यांच्याकडे सुपूर्त करतील. याशिवाय नवीन पदाधिकारीही पदग्रहण करतील. हा कार्यक्रम मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या सभागृहात सायंकाळी ६ वाजता होईल.
रोटरी क्लब ऑफ नाशिक ही संस्था गेल्या ७७ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. समाजातील निरनिराळ्या घटकांचा सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास करण्यासाठी सातत्त्याने प्रयत्नशील असतो. १९४६ मध्ये स्थापन झालेला हा सर्वात जुना क्लब असून विकास योजना प्रत्यक्ष तळागाळापर्यंत पोहोचविण्यात नेहमीच अग्रेसर असतो. एक वैभवशाली परंपरा असलेल्या या क्लबच पदग्रहण समारंभ शनिवारी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाचे संचालक सीए प्रफुल छाजेड तर प्रांतपाल मोहन पालेशा पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ नाशिकचे नूतन सचिव ओमप्रकाश रावत यांनी केले आहे.
……………………………………