गणोरे च्या रोहिणी सहाणे – आंबरे यांचा कृषी आयुक्त श्री सुनील चव्हाण यांचे हस्ते सन्मान!

अकोले प्रतिनिधी :
– . अकोले तालुका कृषी विभाग मधील वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेल्या सौ.रोहिणी ठकसेन सहाणे – आंबरे यांना कृषी आयुक्त श्री सुनील चव्हाण (भा. प्र.से.) यांचे हस्ते लेखा व वित्त आस्थापना या दोन्ही शाखेचे कामकाज सक्षमपणे संभाळ्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
सन 2023 – 24 या वर्षांमध्ये पुणे विभागात राबविण्यात आलेल्या आस्थापना व लेखा विषयांमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कृषी आयुक्त सुनील चव्हाण (भा.प्र.से.) यांच्या हस्ते आज 15 ऑगस्ट 2023 रोजी महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने गौरविण्यात आले.
सौ रोहिणी ठकसेन सहाने – आंबरे ह्या 2014 सालापासून कृषी विभाग महाराष्ट्र शासन मध्ये वरिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत आहे. आतापर्यंत एकूण नऊ वर्ष सेवा कालावधीत पाच वर्षे तालुका कृषी अधिकारी सिन्नर तसेच 2018 सालापासून तर आज पर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालय अकोले या ठिकाणी त्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे. या कामगिरीची दखल म्हणून सन 2023 – 24 साली त्यांचा कृषी विभागाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
अकोले तालुका कृषी अधिकारी कार्यालय व सासरी म्हणजेच गणोरे येथील ग्रामस्थ तसेच आंबरे परिवारातील तसेच माहेरी सावरगाव पाट येथील सहाणे परिवारातील नातेवाईक,ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.
गणोरे येथील सध्या महसूल विभागात मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत असणारे श्री अमोल सूर्यभान आंबरे यांच्या त्या धर्मपत्नी आहेत. त्यामुळे गणोरे गावातील सर्व आंबरे परिवार, सरपंच,उपसरपंच,ग्रामविकास अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, अकोले तालुका कृषी अधिकारी श्री साळवी, तालुका पंचायत कृषी अधिकारी श्रीमती रत्नमाला शिंदे, सर्व कर्मचारी कृषी विभाग अकोले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुशांत आरोटे , शुभम आंबरे, ग्रामपंचायत सदस्य श्री विवेक मच्छिंद्र आंबरे, ग्रामपंचायत सदस्य श्री पोपट आहेर, सुनील कदम, मा.उपसरपंच के.बी. आंबरे, टेलर संतोष उगले, आदींनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.