उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस सेवा कार्याने साजरा

संगमनेर: महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने “सेवा कार्य” अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,बालवाडी,अंगणवाडी शाळा कारमळा, धांदरफळ बु ता संगमनेर जिल्हा अहमदनगर येथे शालेय विद्यार्थी विद्यार्थीनींना खाऊ वाटप करण्यात आला. .त्यानंतर कारेश्वर डोंगरावर वड,पिंपळ,निंब,करंज.उबंर आदिंचे वृक्षारोपण करण्यात आले… यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ, भाजपा वैद्यकीय आघाडी उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष डॉ.महेंद्र कोल्हे ,संगमनेर भाजपा सरचिटणीस वैभवशेठ लांडगे, भाजपा किसान मोर्चा जिल्हा सचिव रोहिदास साबळे, बापु देशमुख, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस हारिष वलवे, भाजपा उपाध्यक्ष गोकुळ देशमुख, विकास गुळवे,कैलास आडभाई, कमलेश डेरे, निलेश कोल्हे तसेच एखंडे सर,भंडारे सर,कर्पे सर आदि शिक्षकवृंद उपस्थित होते….