नाशिकमहाराष्ट्र

मोदी ,शहा अनुकूल असतानाही भुजबळांना डावलले ?

ओबीसी समाज संभ्रमावस्थेत- बाळासाहेब ताजने

अकोले प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना नाशिक मधून उमेदवारी डावलल्याने अहमदनगर जिल्ह्यातील समता परिषद व ओबीसी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे आगामी लोकसभेला काय भूमिका घ्यायची याबाबत अकोले तालुक्यातील सर्व ओबीसी संघटना कार्यकर्ते तसेच समता परिषद कार्यकर्त्यांची लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब ताजणे यांनी दिली

भुजबळ अध्यक्ष असलेल्या समता परिषदेने
राज्यातील नऊ लोकसभा मतदारसंघांत
उमेदवार देण्याची तयारी केली सुरू आहे.
मराठवाड्यातील काही मतदारसंघांत तसे अर्ज दाखलही झाले असून मुंबई, ठाणे, नाशिक, नगर, पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी संभाव्य उमेदवारांनी अर्जही नेले आहेत.
मराठा समाजाला ओबीसी ऐवजी स्वतंत्र आरक्षणाची मागणी भुजबळ यांनी केली होती. त्यानंतर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे आणि ओबीसी योद्धे छगन भुजबळ यांच्यात मराठा आरक्षणावरून सामना
रंगला होता. मराठा समाजाची मने दुखावल्याचा मुद्दा उपस्थित करत भुजबळांच्या उमेदवारी ला विरोध केला ज्या वेळी भुजबळ यांची नाशिकमधील
उमेदवारी जाहीर झाली त्या वेळी सुप्त संघर्ष हा उघड सुरू झाला.त्यामुळे अमित शहा यांनी शिफारस केल्यानंतरही महायुतीने भुजबळ यांच्या नावाची घोषणा केली नाही.
नारायण राणे, उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीची घोषणा होऊनही आपले नाव जाहीर होत नसल्यामुळे भुजबळ यांनी माघार घेतली. त्यानंतर महायुतीच्या एकाही नेत्याने त्याची म्हणावी तशी दखल घेतली नाही. त्यामुळे भुजबळ नाराज झाले अशी जाहीर चर्चा सुरू झाली दरम्यान, समता परिषदेने नाशिकमध्ये बैठक घेत भुजबळांसारख्या देश पातळी वरीलओबीसी नेत्याला डावलू नये अशी भूमिका आता राज्यभरातून ओबीसी समाजाकडून होत आहे तर समता परिषदेने उमेदवार उभे करण्याची रणनीती आखली जात आहे. भुजबळांवर होणाऱ्या अन्याय व आगामी निवडणुकीत काय भूमिका घ्यायची यावर चर्चा करण्यासाठी गावोगावी बैठका घेऊन आगामी भूमिका यावर चर्चा करण्यात येणार असल्याचे बाळासाहेब ताजने यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button