जामगावचा विकासाचा अनुशेष भरून काढणार : सुजीत झावरे पाटील

सुजीत झावरे पाटील यांच्या हस्ते जामगाव येथे शाळा खोल्यांचे भूमिपूजन
पारनेर/प्रतिनिधी :
जामगाव येथे सुजित झावरे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या शाळा खोलीचे भूमिपूजन समारंभ सुजित झावरे पाटील यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना सुजीत झावरे पाटील म्हणाले की राज्यातील जामगाव हे एक ऐतिहासिक दृष्ट्या महत्वपूर्ण गाव असून येथील विकासाचा अनुशेष या पुढील काळात मी भरून काढणार असून जामगावच्या विकासात्मक कामासाठी प्रयत्न करणार आहे. जामगावचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे.
तसेच यावेळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या उपस्थितीत जामगाव येथील करण्यात आला.
यावेळी सरपंच अरुणाताई खाडे, उपसरपंच सोन्याबापू शिंदे, बाळासाहेब शिंदे, मा.उपसरपंच दिनकर सोबले, सोपान मुंजाळ सर, प्रेमराज खाडे , तुकाराम खाडे, त्रिंबक पवार, विष्णू नाईक, रावसाहेब सोबले, राजू नाईक, नवनाथ बांगर, कुंडलिक बर्वे, दत्तात्रय घोडे, ज्ञानेश्वर खाडे, मनोज शिंदे, प्रसाद मेहर, मेजर संतोष तडके, दगडू खाडे, सुनीता नाईक, दिलीप सोबले, संजय शिंदे, बाबासाहेब भुजबळ तसेच गावातील ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थितीत होते.