राजापूर महाविद्यालयात बौद्धिक मालमत्ता अधिकार व पेटंट यावर सेमिनार संपन्न………

संगमनेर -प्रागतिक शिक्षण संस्थेचे नूतन कला महाविद्यालयात दिनांक 26 जुलै 2023 रोजी आय पी आर व पेटंट या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आले.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्कूल कमिटी चेअरमन भाऊसाहेब हासे यांनी भूषविले व सेमिनार साठी शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य डॉ सुभाष कडलग यांनी असे सेमिनार महाविद्यालयात आयोजन झालेच पाहिजे. त्यामुळे प्रा. रिसर्च व पेटंट साठी प्रयत्न करतील.असे सूचक मत मांडले.
.या सेमिनार साठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बुक सागा पब्लिकेशन च्या सर्वेसर्वा प्रा.प्रिया लोकरे राहुरी महाविद्यालय लाभल्या.त्यांनी बौद्धिक मालमत्ता अधिकार व पेटंट कसे फाईल केले जातात ,याचे सुलभ भाषेत मार्गदर्शन करून त्यासंबंधी विविध दाखले दिले.ग्रँट पेटंट चे महत्वही या सेमिनार मधे त्यांनी विषद केले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पाहुण्याचा परीचय प्रा.सुभाष वर्पे यांनी केला. तर आभार प्रा.संतोष गोरडे यांनी मानले.याप्रसंगी महाविद्यालयातील सर्वच प्राध्यापकांनी सक्रीय सहभाग घेतला.
कमी शब्दांत संपुर्ण बातमी लोकांपर्यंत पोहोचविण्याची आपल्या बातमीदाराची हातोटी आवडली
आपल्या वृत्तपत्राला खुप-खुप शुभेच्छा सर
thanks