अहमदनगर

पळवे खुर्द च्या सरपंच पदी जनाबाई तरटे यांची बिनविरोध निवड

आमदार लंके यांचे मध्यस्थीने गावाच्या विकासासाठी

चुलते – पुतणे एकत्र!

दत्ता ठुबे
प्रतिनिधी पारनेर :
पारनेर तालुक्यातील पळवे खुर्द येथील सरपंच सरिता जगताप यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदी जनाबाई तरटे यांची बिनविरोध निवड झाली.
अनेक नाट्यमय घडामोडीनंतर संजय तरटे आणि प्रसाद तरटे या चुलते – पुतणे यांनी गावच्या विकासासाठी एकत्र येण्याचं आवाहन आ. लंके यांनी दोघांना केल्याने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आ.निलेश लंके यांची मध्यस्थी यशस्वी झाली.


गावातील प्रलंबित असलेले कामे प्राधान्यक्रमाने सोडवून गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू असे प्रतिपादन यावेळी सरपंच जनाबाई तरटे यांनी केले.
यावेळी मा.सरपंच रामदास तरटे, सैनिक बँकेचे संचालक संजयजी तरटे,मा उपसरपंच तात्यासाहेब देशमुख, मा.चेअरमन रोहिदास नवले, ज्येष्ठ मार्गदर्शक तात्याभाऊ शेळके सर, मा.उपसरपंच संजय नवले,विश्वस्त पंडित देशमुख, मा.चेअरमन गजाराम तरटे,विद्यमान चेअरमन विलास तरटे, व्हा.चेअरमन आबा इरकर, अमोलजी शेळके,रवींद्र नवले, शांताराम तरटे,ठकाजी तरटे,नामदेव गाडिलकर,पोपटराव शेलार,पोपट तरटे,गणपत जगताप,दादाभाऊ गुंड वसंत देशमुख, चंद्रकांत बारगळ,बाबाजी गाडिलकर, शंकर गवळी,पोपट पाचरणे,संपत गाडिलकर, बापू पळसकर, सोपान पवार, संभाजी पाचर्ने, जातेगाव दे. ट्रस्ट चे कार्याध्यक्ष विजयकुमार जगताप तसेच मा. सरपंच सरिताताई जगताप विद्यमान ग्रा.प सदस्य रमेशनाना पाचारणे,संगीताताई शेलार,दत्ता गाडिलकर, उपसरपंच अमोल जाधव यांच्यासह गावातील तरुण महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संजय तरटे व तात्या देशमुख म्हणाले की आ.लंके यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून आपसातील मतभेद मिटले असून या पुढे सर्व घटकांना सोबत घेवून गावच्या विकासाला प्राधान्य देणार आहोत ग्रामसचिवालय, सबस्टेशन, सिंगल फेज लाईट हे प्रामुख्याने असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध राहू.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button