काष्टी सोसायटीत परिसरातील डाॅक्टरांचा केला सन्मान !.

श्रीगोंदा प्रतिनिधी
सहकार महर्षी काष्टी सोसायटीत काष्टी भागातील डाॅक्टरांचा सन्मान सोहळा आयोजीत करण्यात आला होता.सोसायटीचे चेअरमन राकेश पाचपुते अध्यक्षस्थानी होते.
यावेळी मार्गदर्शन करताना ज्येष्ट नेते कैलासतात्या पाचपुते म्हणाले की रूग्णसेवा ही ईश्वरसेवा आहे.कोरोना सारख्या जागतिक संकटाचे काळात डाॅक्टरांनी स्वतःचे जीवाची पर्वा न करता रूग्णसेवा केली आहे.कर्तव्य भावनेतून सामाजिक बांधिलकी जपणारांचा यथोचीत सन्मान करण्याचा काष्टी सोसायटीचा संकल्प कौतुकास्पद आहे.असे गौरवोदगार कैलासतात्या पाचपुते यांनी व्यक्त केले.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.नितीन खामकर,श्रीगोंदा मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डाॅ.संतोष काकडे,काष्टीचे अध्यक्ष डाॅ.नवनाथ कोल्हटकर तसेच काष्टी भागातील सर्वच डाॅक्टर बंधूभगिनी उपस्थित होते.यावेळी सोसायटीचे मार्गदर्शक कैलासतात्या पाचपुते,चेअरमन राकेश पाचपुते,व्हा.चेअरमन शहाजी पाटील भोसले,संचालक अॅड.विठ्ठलराव काकडे,प्रा.सुनिल माने,सुभाष पाचपुते,काशिनाथ काळे,बाळासाहेब पाचपुते,संजय नलगे आदिसह सर्व संचालक मंडळ,सभासद,कामगार उपस्थित होते.
प्रास्ताविक विठ्ठलराव काकडे तर सुत्रसंचालन सुनिल माने यांनी केले.यावेळी डाॅक्टरांचे वतीने नितीन खामकर,विश्वास भापकर,नवनाथ लाड,संजय कोकाटे,बाळासाहेब पवार,प्रिती नांद्रे,संजय टकले,संतोष जठार,संदीप कोकाटे आदिंनी मनोगत व्यक्त करून सोसायटीला धन्यवाद दिले.शहाजी पाटील भोसले यांनी आभार मानले.समाप्त.