गणोरे त ,लाडक्या बहिणींमुळे ,मतदानाची टक्केवारी वाढली.!

गणोरे प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात आज मतदारांनी आपले मत मतपेटीत मतदारांचे भविष्य बंदिस्त करून लोकशाहीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.
गणोरे (ता.अकोले ) येथे मागील विधानसभेला मतदारांचा उत्साह बघता विधानसभा २०२४ मतदानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट आले
मागील विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीत यंदा जवळपास दहा टक्क्यांनी वाढ झाली कदाचित लाडक्या बहिणींचा उदंड प्रतिसाद मिळाला गणोरेमध्ये सायंकाळी साडे पाच सुमारास जवळपास ६८.७० % मतदान झाले . नंतरच्या अर्ध्या तासात जवळपास दोन टक्क्यांनी वाढ झाल्याचे कळून आले. . ह्या वेळेस महिला मुली उत्सुफुर्त मतदानासाठी बाहेर पडल्याचे जाणवले. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मुलींपासून तर अगदी ८५ वर्षांच्या वयोवृध्द महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.

एकूण १९९४ पैकी १३६३ महिलांनी तर २०८५ पैकी १४४९ पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुषांच्या तुलनेत महिलांची मतदानाची आकडेवारी जास्त असल्याचे दिसून आली. त्यासोबतच तरुणांचा मतदानाचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. गणोरे मध्ये यंदा मतदानाने सत्तरी ओलांडलेली पाहायला मिळाली. वाढलेली आकडेवारी कोणाला फायद्याची ठरते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
यावेळी जवळपास एकूण ३० कर्मचारी मतदान प्रक्रियेकरिता उपस्थित होते.

अकोले पोलीस निरीक्षक श्री मोहन बोरसे,पोलीस उपनिरीक्षक श्री विनोद खांडबहाले यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दिवसभरात मतदान निरीक्षक, नोडल अधिकारी श्री आनंद अल्ले तसेच इतर अधिकारी यांनी मतदान केंद्रास भेट दिली. मतदान अतिशय शिस्त व शांततेत पार पडले. मतदानानंतर सर्व पक्षीय कार्यकर्ते यांनी मतदारांचे आभार मानले.