थकाबाई’ या आगामी मराठी चित्रपटाची केली घोषणा !

मॉडेल उर्फी जावेदनेही थकाबाई चे पोस्टर शेअर करत टीमला दिल्या शुभेच्छा
मुंबई -थकाबाई’ या आगामी मराठी चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. प्रेक्षकांची पसंती ओळखून एक दर्जेदार रहस्यपटाचा नजराणा घेऊन दिग्दर्शक युवीन कापसे मराठी चित्रसृष्टीत पदार्पण करत आहेत. चित्रपटातील कलाकार शुभंकर तावडे, हेमल इंगळे, मीर सरवर, सना प्रभू तसेच दिग्दर्शक आणि निर्माते यांच्या उपस्थितीत चित्रपटाच्या घोषणेचे पहिले पोस्टर याप्रसंगी लाँच करण्यात आले. ‘थकाबाई’च्या पोस्टरला अल्पावधीतच प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद लाभला आणि विशेष म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार, मॉडेल उर्फी जावेदनेही हे पोस्टर शेअर करत टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
‘थकाबाई’चे गूढ आणि भयावह वाटणारे पोस्टर बघून साक्षात उर्फी जावेदचीसुद्धा उत्सुकता वाढली आहे. तिने सोशल मीडियावर याबाबत स्टोरी शेअर करत चित्रपटाच्या निर्मात्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत. उर्फी ही आजच्या काळातली आघाडीची इन्फ्लुएन्सर असून तिने शेअर केलेल्या स्टोरीमुळे तिच्या चाहत्यांचीही उत्सुकता वाढली आहे.
सुनील जैन प्रस्तुत आणि दीवा सिंह, युवीन कापसे निर्मित ‘थकाबाई’ चित्रपट कधी प्रदर्शित होईल याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे
रहस्यमयी आणि गूढ चित्रपटांना मराठी प्रेक्षक कायमच पसंती देतात, असाच एक रहस्यमयी चित्रपट नवोदित दिग्दर्शक युवीन कापसे घेऊन येत आहेत. ‘थकाबाई’ असं या चित्रपटाचं नाव असून चित्रपटाचे पोस्टर लाँच नुकतेच बांद्रा येथील शॉ किया शोरूममध्ये पार पडले. नावातच रहस्य असलेल्या चित्रपटात शुभंकर तावडे आणि हेमल इंगळे मुख्य भूमिकेत दिसतील तर अभिनेते मीर सरवर एका विशेष भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत.

‘थकाबाई’ चित्रपटाचे पोस्टर त्याच्या विषयासारखेच रहस्यमयी त्यावर शुभंकर तावडेचा एक भयावह लूक त्याच्या उग्र हावभावांसह या पोस्टरवर दिसतोय. तर हेमल इंगळे रहस्याचा शोध घेणाऱ्या मुलीच्या भूमिकेत दिसत आहे. तिच्या हातात कंदिल असून ती जंगलात काहीतरी शोधतेय अशी मुद्रा तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे. ‘सत्य की असत्य थकाबाई: जाणे रहस्य’ या नावातच असलेल्या टॅगलाईनमुळे नक्की चित्रपटात काय असेल? थकाबाई म्हणजे नक्की कोण? आणि तिचं काय रहस्य आहे? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
सुनील जैन प्रस्तुत आणि दीवा सिंह, युवीन कापसे निर्मित ‘थकाबाई’ चित्रपटाच्या पोस्टर लॉन्च प्रसंगी अजय गेही, दानिश अल्फाज, जयकुमार नायर, आमीर सिकंदर, मुदसिर भट, प्रतिक्षा मिश्रा, मकरंद उपाध्याय, नामदेव कापसे आदी मान्यवर उपस्थित होते.