ग्रामपंचायत कराबाबत बाबत पोल्ट्री व्यवसायिकांना सवलत मिळावी

अकोले – संगमनेर तालुका पोल्ट्री असोसिएशन चे मंत्री ना. विखेंना निवेदन
अकोले प्रतिनिधी
पोल्ट्री कंपन्यांच्या मनमानी थांबवावी व ग्रामपंचायत कर या बाबत पोल्ट्री व्यवसायिकांना सवलत मिळावी अशी मागणी संगमनेर- अकोले तालुका पोल्ट्री व्यवसायिकांनी पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे
पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री विखे हे बुधवारी अकोले तालुका दौऱ्यावर आले असता पोर्ल्ट्री व्यावसायिकांनी त्यांना निवेदन दिले
ग्रामपंचायत पोल्टी कर संदर्भात व पोल्टी कंपन्यांची मनमानी कारभार या विषयी त्यांनी मंत्र्यांकडे तक्रार केली
पोल्टी व्यवसाय शेतीवर आधारित आहे महसूल कार्यक्षेत्रात असतो तसे च हा व्यवसाय लघुउद्योग म्हणून संबोधला जातो वंशपरंपरेने पूर्वी काळापासून या
व्यवसायाला प्राधान्य क्रम महाराष्ट्र शासन भारत सरकारने दिलेले आहे त्याच आधारावर हा व्यवसाय पुढे चालू आहे पण स्थानिक ग्रामपंचायत या व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर कर मागणी वसूल करत आहे या करातून पोल्टी व्यवसायना यातून कर मुक्ती व्हावी
तसेच पोल्टी व्यवसाय हा बाजार समिती व शेतकरी या धर्तीवर आधारित आहे म्हणून आम्हा पोल्टी व्यवसायिकांची मोठ्याप्रमाणावर कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे पोल्टी व्यवसाय हा धोक्यात आला आहे तरी या त मंत्री महोदय यांनी लक्ष घालून न्याय द्यावा अशी मागणी अकोले- संगमनेर तालुका पोल्ट्री असो. चे अध्यक्ष बाळासाहेब भा. देशमुख, बाळासाहेब कानवडे दीपक शेवंते ,किसन पिचड ,शिवाजी गवारी, राहुल नवले यांनी केली आहे