भाजपा आय.टी. सेल च्या विभागीय संयोजक पदी खताळ पाटील

संगमनेर ( प्रतिनिधी)
तालुक्याचे युवा नेते श्री. विक्रमसिंह खताळ पाटील यांची भारतीय जनता पार्टी उत्तर महाराष्ट्राच्या आय. टी. सेल विभागीय सहसंयोजक पदी निवड करण्यात आली.
भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आय टी सेल ची प्रदेश कार्यकारणी घोषित केली. त्यात उत्तर महाराष्ट्र ची जबाबदारी विक्रमसिंह खताळ पाटील यांचे वर देण्यात आली. विक्रमसिंह खताळ पाटील हे माजी मंत्री व संगमनेर तालुक्याचे भाग्यविधाते स्व बॅरिस्टर बि. जे.खताळ पाटील यांचे नातू, खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे नातेवाईक असून भाजपा महिला आघाडी च्या प्रदेश उपाध्यक्षा मीनाक्षीताई पाटील यांचे जावई आहेत.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय आहे. त्यांच्या निवडीचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, आय.टी सेल चे उत्तर नगर जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे पाटील यांनी अभिनंदन केले आहे. या निवङीचे पिंपरणे येथे शुभम देशमुख यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. शुभम देशमुख म्हणाले अहमदनगर जिल्ह्यासाठी खताळ पाटील परिवाराचे योगदान कधीही विसरता न येण्यासारखे आहे. स्व मा मंत्री बॅरिस्टर बि जे खताळ पाटील यांचे पावलांवर पाउल ठेवून काम करत आहेत. विक्रमसिंह खताळ पाटील दादांच्या रूपाने उत्तर महाराष्ट्राला नवीन नेता मिळाला! गल्लीपासून दिल्लीपर्यंत ओळख असलेले ते एकमेव नेते आहेत व आपण सर्वांनी त्यांच्या पाठिशी प्रामाणिक राहिले पाहिजे असे प्रतिपादन शुभम देशमुख यांनी केले!