वसुधा परांजपे पुरस्कार हेरंब कुलकर्णी यांना प्रदान

अकोले प्रतिनिधी
पुणे विद्यार्थी सहायक समिती व परांजपे कुटुंबीय यांच्या वतीने दिला जाणारा वसुधा परांजपे स्मृती सामाजिक पुरस्कार साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांच्या हस्ते हेरंबकुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी बोलताना हेरंबकुलकर्णी यांनी वाढत्या व्यक्तिकेंद्रित समाजात गरीबांचे प्रश्न कसे पोहोचवायचे हीच मोठी समस्या असून मध्यमवर्ग चळवळीपासून दूर झाल्याने चळवळी रोडावल्या आहेत.तेव्हा तरुण पिढीपर्यंत गरीबांचे प्रश्न पोहोचवणारी माध्यमे निर्माण करायला हवी..
यावेळी बोलताना सदानंद मोरे यांनी कोणतेही वेगळे काम निष्ठेने करणारे लोक हे प्रतिभावंत असतात.अशा व्यक्तींना जपणे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे यासाठी हा पुरस्कार महत्वाचा असल्याची भावना व्यक्त केली
यावेळी सुषमा पाध्ये यांना शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार देण्यात आला. शिक्षणतज्ञ रमेश पानसे कार्यक्रमाला उपस्थित होते