रणद बु!! येथे ‘जागतिक आदिवासी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा .

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील रणद बु!! येथे दिनांक 9 ऑगस्ट रोजी जि.प.प्राथ.शाळा रणद बु!! व ग्रामपंचायत रणद बु!!, तसेच तरुण वर्ग, महिला वर्ग तसेच कामगार वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक आदिवासी दिन’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची गावात फेरी काढण्यात आली. या फेरीत ‘एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान। ‘, ‘पढेंगे तो लढेंगे, लाढेंगे तो जितेंगे।’, ‘जब तक सुरज चाँद रहेगा, बिरसा तेरा नाम रहेगा।’ ‘आदिवासी एकजुटीचा विजय असो।’, ‘जागतिक आदिवासी दिनाचा विजय असो।’ ‘राघोजी भांगरे अमर रहे।’ अशा घोषणा देत सर्वांनी जल्लोष केला.

विद्यार्थ्यांनी गावातील चौकाचौकात आदिवासी नृत्य सादर करत सर्वांची मने जिंकून घेतली.
त्यानंतर शाळेत सर्वजण एकत्र जमून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य बिरसा मुंडा व क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. मुलांनी आपल्या मनोगतातून जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व सांगितले. गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री. गणपतराव देशमुख यांनी राघोजी भांगरे, बिरसा मुंडा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव केला. शाळेचे उपाध्यापक श्री. शरद मडके सर यांनी आदिवासी जीवनशैली आपल्या ओघवत्या शब्दांत स्पष्ट करत सर्वांची मने जिंकली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अकोले शाखेचे तालुकाध्यक्ष श्री. विजयभाऊ पवार यांनी आपली उपस्थिती नोंदवत रॅलीत सहभाग नोंदवला व सर्व आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या व सामाजिक बांधिलकी जपत चहा नाश्त्याची सोय उपलब्ध करून दिली. ग्रामसचिव श्री. काकड भाऊसाहेब, गावचे सरपंच आदरणीय श्री. सुंदरलाल भोईर यांनीही सर्वांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

उपसरपंच श्री. मच्छिंद्र कोरडे, वि.का.से.सो.चे चेअरमन श्री. विठ्ठल पोरे, संचालक श्री. निवृत्ती पटेकर, श्री. कुंडलिक कोरडे, श्री. भाऊ बांबळे, श्री. गणपत वाळु पटेकर, श्री. सुनिल मंगळा पटेकर, श्री. स्वप्निल एकनाथ पटेकर, श्री. अविनाश देशमुख, श्री. शंकर वायळ, श्री. मच्छिंद्र गोविंदा पटेकर, श्री. विठ्ठल वायळ यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी गावातील तरुण वर्ग, महिला भगिनी व आबालवृद्ध यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. यावेळी ‘आमची माती, आमचा देश’ उपक्रमांतर्गत ‘पंचप्रण शपथ’ घेण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वि.का.से.सो.चे चेअरमन श्री. विठ्ठल पोरे यांनी भूषविले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सरपंच, उपसरपंच, शा. व्य. समिती अध्यक्ष श्री. गणपत पटेकर व सर्व सदस्य, सामाजिक कार्यकर्ते श्री. गणपतराव देशमुख, शाळेचे मुख्याध्यापक श्री. लक्ष्मण नाडेकर सर, श्री. धिंदळे सर यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रोहिदास जाधव सर यांनी केले तर, आभार श्री. मडके सर यांनी केले. शेवटी खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.