अहमदनगर
संगीता देठे – नरसाळे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार!

गोरेगाव ग्रामस्थांच्या वतीने केला सन्मान
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
ग्रामसेविका श्रीम. संगीता देठे- नरसाळे यांना यावर्षीचा “आदर्श ग्रामसेविका” पुरस्कार जाहीर झाला असून त्याबद्दल गोरेगाव ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब तांबे यांनी गोरेगाव येथे ग्राम संसद कार्यालयात त्यांचा सन्मान केला.
यावेळी बोलताना माजी सभापती बाबासाहेब तांबे म्हणाले आदर्श ग्रामसेवक पुरस्कार हा तालुक्यातून दरवर्षी एकालाच मिळतो.तालुक्यात १३१ गावे आहेत. यातून एका ग्रामसेवकाला हा पुरस्कार दिला जातो. ही एक अभिमानास्पद आहे कारण हे मिळताना अनेक प्रकारचे मूल्यमापन केले जाते, विविध विषय असतात त्यांना मार्क असून त्यातून निवड केली जाते आणि यावर्षीचा पुरस्कार श्रीमती संगीता देठे- नरसाळे यांना मिळाला आहे ही बाब गोरेगावच्या दृष्टीने अभिमानास्पद असुन असेच नाव यापुढे गोरेगावचे व्हावे अशी अपेक्षा करतो. ग्रामसेवक म्हणून जसे आपण डिकसळला काम केले त्यापेक्षाही अधिक चांगले काम आपल्या हातून हिंगणगाव येथे व्हावे. कोणत्याही क्षेत्रात काम करताना सर्वच माणसे वाईट नसतात ग्रामसेवक हा गावच्या विकासाचा कणा आहे त्यामुळे ग्रामसेवकाची जबाबदारी फार मोठी असते. हल्ली लोक वेगळ्या नजरेने ग्रामसेवकांकडे पाहतात परंतु सर्वच ग्रामसेवक कामात हलगर्जीपणा करतात असे नाही यामध्येही काही चांगले लोक आहेत. यावेळी श्रीमती संगीता देठे यांचे सासू सौ. उज्ज्वला नरसाळे,सासरे निवृत्त मेजर धोंडिभाऊ नरसाळे, पती सतिष नरसाळे गुरुजी उपस्थित होते त्यांच्याही दृष्टीने हा चांगला दिवस आहे.त्यांच्या समवेत आपल्या सुनेचा गावच्या वतीने सत्कार होतोय हे कोणाच्याही नशिबात नसते, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाकडूनही त्यांचे कौतुक झालेच पाहिजे आणि पुन्हा एकदा तुम्हाला मिळालेल्या पुरस्काराबद्दल गोरेगाव ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. श्रीमती संगीता देठे- नरसाळे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्याच्या विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी, जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते सर, शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, तालुका प्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, महिला आघाडी प्रमुख प्रियंका ताई खिलारी, युवा सेना तालुकाप्रमुख नितीन शेळके यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
: प्रशासनामध्ये काम करत असताना एक सामाजिक बांधिलकी जपून समाजासाठी सतत काही तरी करत रहावे असे मला नेहमी वाटते हा पुरस्कार माझ्या कामाची पावती असून एक स्त्री म्हणुन कुटुंबातील जबाबदारी पार पाडताना मला माझे सासू-सासरे, पती आणि प्रशासनातील पंचायत समितीचे विस्तार अधिकारी महादेव भोसले यांचे मार्गदर्शन लाभले :
श्रीम संगिता देठे – नरसाळे, ग्रामसेविका.
यावेळी उपसरपंच दादाभाऊ नरसाळे, ग्राम. सदस्य अण्णा नरसाळे, संपत नरसाळे, सदस्य साहेबराव नरसाळे, गणेश तांबे, रमा नरसाळे, सिताराम नांगरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.